Interesting story of most beautiful queen Cleopatra who bathed with donkeys milk to look gorgeous
जगातली सर्वात सुंदर राणी, जी आपली सुंदरता कायम ठेवण्यासाठी करत होती 'हे' विचित्र काम By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 3:13 PM1 / 9काही लोक मानतात की, क्लियोपात्राने सापाचं विष पिऊन आत्महत्या केली होती. तर काही लोक म्हणतात की, तिचा मृत्यू नशेच्या पदार्थामुळे झाला. 2 / 9आम्ही तुम्हाला सांगतोय इजिप्तची राजकुमारी क्लियोपात्राबाबत. जिला सुंदरतेची देवी मानलं जातं. क्लियोपात्राला तिच्या सुंदरतेसाठी आणि तिच्या रहस्यमय जीवनासाठीही ओळखलं जातं. ती एक चतुर आणि षड्यंत्रकारीही होती.3 / 9वडिलांच्या मृत्यूनंतर केवळ १४ वर्षांची असताना क्लियोपात्रा आणि तिचा भाऊ टोलेमी दियोनिससला संयुक्तपणे राज्य मिळालं होतं. भावाला राज्यावर क्लियोपात्राची सत्ता सहन होत नव्हती आणि यावरून वाद पेटला. झालं असं की, क्लियोपात्राला आपली सत्ता सोडावी लागली आणि सीरियात शरण घ्यावी लागली.4 / 9पण राजकुमारीने हिंमत सोडली नाही. रोमचा शासक ज्यूलिअस सीजरला आपल्या सुंदरतेच्या जाळ्यात अडकवून क्लियोपात्राने इजिप्तवर हल्ला करवला आणि सीजरने टोलेमीला मारून क्लियोपात्राला इजिप्तच्या सिंहासनावर बसवलं.5 / 9असं सांगितलं जातं की, क्लियोपात्रा इजिप्तवर शासन करणारी शेवटची फराओ होती. ती आफ्रिकन, कॉकेशिअस किंवा युनानी होती, हे अजून रहस्य बनून आहे. यावर आजही शोध सुरू आहे. क्लिओपात्राचा मृत्यू ३९ वयाची असताना झाला होता. पण तिचा मृत्यू कसा झाला हे समजू शकलेलं नाही.6 / 9क्लियोपात्रा सुंदर दिसण्यासाठी दररोज ७०० गाढवीणींचं दूध मागवत होती आणि त्याने आंघोळ करत होती. ज्याने तिची त्वचा नेहमी सुंदर राहत होती. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हे सिद्ध झालंय.7 / 9तुर्कीमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, जेव्हा उंदरांना गायीचं आणि गाढवीणीची दूध पाजण्यात आलं तेव्हा गायीचं दूध पिणारे उंदीर जाड दिसले. यावरून हे स्पष्ट होतं की, गाढवीणीच्या दुधात गायीच्या दुधाच्या तुलनेत कमी चरबी असते. 8 / 9असं सांगितलं जातं की, क्लियोपात्रा इजिप्तवर शासन करणारी शेवटची फराओ होती. ती आफ्रिकन, कॉकेशिअस किंवा युनानी होती, हे अजून रहस्य बनून आहे. यावर आजही शोध सुरू आहे. क्लिओपात्राचा मृत्यू ३९ वयाची असताना झाला होता. पण तिचा मृत्यू कसा झाला हे समजू शकलेलं नाही.9 / 9काही लोक मानतात की, क्लियोपात्राने सापाचं विष पिऊन आत्महत्या केली होती. तर काही लोक म्हणतात की, तिचा मृत्यू नशेच्या पदार्थामुळे झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications