Interesting story of three legged man Frank Lentini you will shock
OMG! तीन पाय अन् दोन गुप्तांग असलेल्या व्यक्तीची अजब कहाणी, ७७ वर्ष लोकांमध्ये बनून होता रहस्य! By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 6:41 PM1 / 12जगभरात अनेक अजब गोष्टी आहेत. अनेकांनी अजब गोष्टी पाहिल्याही असतील. पण तुम्ही कधी तीन पाय असलेला व्यक्ती पाहिलाय का? तसं तर निसर्गाने पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला एकसारखं बनवलं आहे. पण काही लोकांच्या शरीराची बनावट अनोखी असते. त्यांना बघून कुणीही हैराण होतं. अशीच काहीशी कहाणी आहे इटलीच्या एका व्यक्तीची. त्याला दोन नाही तर तीन पाय होते. 2 / 12नक्कीच ही लोकांना हैराण करणारी बाब होती. पण सत्य होती. निसर्गाने त्याला असामान्य रूपात जन्माला घातलं. आणि या असामान्य रूपासोबत तो ७७ वर्षे जिवंत राहिला. 3 / 12आम्ही ज्या व्यक्तीबाबत तुम्हाला सांगतोय त्याचं नाव होतं फ्रान्सेस्को फ्रॅंक लेंटिनी. त्याचा जन्म १८ मे १८८९ मध्ये इटलीच्या सिलिली द्वीपावर झाला होता. 4 / 12फ्रॅंक लेंटिनी आपल्या १२ भाऊ-बहिणींमध्ये पाचव्या क्रमांकाचा होता. तो फार लहान असतानाच त्या आई-वडिलांनी त्याच्या काका-काकीकडे पाठवलं होतं. तिथेच त्याचं पालन पोषण झालं आणि तिथेच त्याच्या करिअरची सुरूवात झाली. 5 / 12तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, लेंटिनीला तीन पाय आणि दोन गुप्तांग होते. त्याचा चौथा पाय त्याच्या तिसऱ्या पायाच्या गुडघ्यातून निघत होता. पण तो पाय पूर्णपणे विकसित होऊ शकला नाही.6 / 12असं सांगितलं जातं की, लेंटिनी एकप्रकारच्या विकाराने पीडित होता. ज्यात त्याच्या अर्ध्या शरीराला जुळं बाळ जोडलेलं होतं. ते बाळ याच्या पाठीच्या कण्यासोबत जुळलेलं होतं. फ्रॅंक लेंटिनीला आपलं संपूर्ण आयुष्य तीन पाय, चार तळपाय आणि दोन गुप्तांगासोबत जगावं लागलं.7 / 12असं नाही की फ्रॅंक लेंटिनीने त्याचे अतिरिक्त अवयव हटवण्याचा प्रयत्न केला नव्हता. पण डॉक्टरांनी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की, त्याने असं केलं तर त्याला लखवा मारू शकतो. तो नेहमीसाठी अपंग होऊ शकतो. 8 / 12१२ वर्षांचा असताना फ्रॅंकची भेट विंसेनजो मॅगनॅनो नावाच्या व्यक्तीसोबत झाली होती. तो त्यावेळी एका सर्कसचा मालक होता. त्याने फ्रॅंकल सर्कशीत भरती होण्याचा सल्ला दिला होता. फ्रॅंकला हा सल्ला आवडलाही. 9 / 12बघता बघता फ्रॅंक सर्कशीत प्रेक्षकांची पहिली पसंत ठरला. तीन पाय असूनही त्याच्या कमालीची एनर्जी होती. तो तिसऱ्या पायाने फुटबॉलला किक मारत होता. जे लोकांना खूप आवडायचं. सोबतच तो हजरजबाबी होता. 10 / 12अनेकदा फ्रॅंक त्याच्या तिसऱ्या पायाचा वापर एका स्टूलप्रमाणे करत होता आणि त्यावर बसत होता. त्याला लोक विचारायचे की तू तीन पायांचा शूज कुठून खरेदी करतो? यावर तो सांगायचा की, तो दोन जोडी शूज खरेदी करत होता. आणि त्यातील एक शिल्लक राहिलेला शूज तो त्याच्या एका पायाच्या मित्राला देत होता.11 / 12१९०७ मध्ये फ्रॅंक लेंटिनीने थेरेसा मुरे नावाच्या महिलेसोबत लग्न केलं. या लग्नातू त्याला चार मुले झाली. पण दोघे आयुष्यभर सोबत नव्हते. १९३५ मध्ये दोघे वेगळे झाले. त्यानंतर फ्रॅंकने हेलेन शुपे नावाच्या महिलेसोबत दुसरं लग्न केलं आणि अखेरपर्यंत ती त्याच्यासोबत राहिली. 12 / 12२१ सप्टेंबर १९६६ ला अमेरिकेच्या टेनेसीमध्ये ७७ वर्षाचा असताना फ्रॅंक लेंटिनीचं निधन झालं. त्याने इटलीपासून ते अमेरिकेपर्यंत सर्कसचे अनेक शो केले. अनेक सर्कसमध्ये काम केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications