यापुढे कॉफी सांडली तर वाईट वाटून घेऊ नका, गिऊलिया तुम्हाला त्यापासून चित्र काढुन देईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 19:24 IST
1 / 5जगात अनेक उत्तम चित्रकार आहेत. आपण अनेकांच्या कलाकृती पाहिल्याही असतील. पण आज आम्ही तुम्हाला सांगत असलेली चित्रकार जरा हटके आहे. तिची कलाकृती अगदी वेगळी आहे.2 / 5आम्ही सांगत असलेली ही कलाकार म्हणजे इटलीची (Italian Artist) गिऊलिया बर्नार्डेली (Giulia Bernardelli). गुलिया ही तायर कॉफी (Coffee) कॅनव्हासवर सांडवून त्यातू उत्कृष्ट अशी चित्र रेखाटते.3 / 51987 मध्ये मँटुआ (Mantua) येथे जन्मलेली गिऊलिया (Giulia) हिने Accademia of Fine Arts of Bologna येथून पदजवी घेत नंतर आपलं स्वत:च आर्टिस्टिक करियर सेट केलं आहे. ती तिच्या चित्रामधून रोजच्या जीवनातील गोष्टी रेखाटते.4 / 5गिऊलियाने आतापर्यंत कॉफीपासून चित्र तयार करत असून आता ती आयसस्क्रिमपासूनही चित्र रेखाटण्याचा सराव करत आहे.5 / 5गुलियाच्या मते तिने स्वत: या नव्या कलेला जन्म दिला असून ती याला आणखी पुढे नेऊ इच्छिते.