शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इवांका ट्रम्पने एकेकाळी फॅशन विश्वातही घातला होता धुमाकूळ, फोटोत बघा रॅम्पवर कसा असायचा तिचा जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 11:56 AM

1 / 11
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ तारखेला दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. सोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प असणार आहे. आता माहिती समोर आली की, डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पही भारत दौऱ्यावर येणार आहे. (Image Credit : in.pinterest.com)
2 / 11
इवांकाचं नाव जगातल्या प्रभावशाली महिला उद्योजिकांमध्ये घेतलं जातं. पण उद्योग क्षेत्रात येण्याआधी इवांका ही मॉडलिंग करायची. त्यावेळी रॅम्पवर तिने आपला जलवा दाखवला आहे. (Image Credit : vanityfair.com)
3 / 11
इवांका त्यावेळी वेगवेगळ्या मॅगझिनच्या कव्हरपेजवर सुद्धा झळकली आहे. (Image Credit : vanityfair.com)
4 / 11
१९९७ मध्ये इवांका थेअरी मुगलरसाठी रॅम्प वॉक करायची
5 / 11
१९९७ मध्ये मार्क बूवेर फॅशन शोमध्ये इवांका...(Image Credit : insidehook.com)
6 / 11
१९९८ मध्ये इवांका ट्रम्पचा लूक असा होता. इथे ती थेअरी मुगलरसाठी रॅम्प वॉक करण्यासाठी आली होती. (Image Credit : insidehook.com)
7 / 11
१९९९ मध्ये विवियन वेस्टवुडसाठी इंवाका रॅम्पवर आली होती.
8 / 11
इवांकाचं नंतर लग्न झालं आणि ती फॅशन बिझनेस आली. सामान्यपणे ती राजकीय बाबींपासून दूरच राहते.
9 / 11
ती ट्रम्प ग्रुपची कार्यकारी उपाध्यक्ष आहे. (Image Credit : photogallery.indiatimes.com)
10 / 11
इवांका ट्रम्प याआधी भारत दौऱ्यावर आली होती. २०१७ मध्ये ती हैदराबादमध्ये एका कार्यक्रमासाठी आली होती. (Image Credit : msn.com)
11 / 11
काही लोक तर इवांकाकडे अमेरिकेची भावी राष्ट्राध्यक्ष म्हणूनही बघतात.
टॅग्स :Ivanka Trumpइवांका ट्रम्पAmericaअमेरिकाfashionफॅशनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प