Japan Announced To Give Four Lac Rs To Married Couple For Encouraging Towards Giving Birth
लग्न करा अन् मिळवा साडेचार लाख रुपये; ‘या’ देशाच्या सरकारचा अनोखा निर्णय By प्रविण मरगळे | Published: September 22, 2020 3:11 PM1 / 10जपानमधील जन्म दर वाढविण्यासाठी सरकारने एक अनोखं पाऊल उचललं आहे. सरकारने विवाहित जोडप्यांना सहा लाख येन म्हणजेच सुमारे साडेचार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. 2 / 10देशात वेगाने घसरत जाणाऱ्या जन्मदाराला आळा घालणे आणि लग्न केलेल्या जोडप्यांना मुल जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देणे यासाठी सरकारने अशाप्रकारचा निर्णय घेतला आहे. 3 / 10गेल्या वर्षी जपानमध्ये सर्वात कमी ८ लाख ६५ हजार मुले जन्माला आली होती आणि एका वर्षात जन्मदरापेक्षा मृत्यूची संख्या ५ लाख १२ हजारांपेक्षा जास्त होती. जन्म आणि मृत्यूच्या आकडेवारीतील फरक आतापर्यंत सर्वात मोठा आहे. जपानची लोकसंख्या १२ कोटी ६८ लाख इतकी आहे. 4 / 10लोकसंख्येनुसार, जपान जगातील सर्वात वयोवृद्ध देश आहे, या ठिकाणी १०० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या देखील जास्त आहे. लेन्सेटने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जपानमध्ये जन्म दर असाच राहिला तर २०४० पर्यंत वृद्धांची संख्या ३५ टक्क्यांपेक्षा जास्त होईल.5 / 10जन्म आणि मृत्यू दर यांच्यामधील ही तफावत दूर करण्यासाठी जपान सरकारने हा निर्णय घेतला आहे, त्यासाठी सरकारने काही अटीदेखील ठेवल्या आहेत, ज्याअंतर्गत काही जोडपेच यासाठी पात्र ठरू शकतात. 6 / 10या योजनेचा एक भाग होण्यासाठी जोडप्याचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि दोघांची एकत्रित कमाई ३८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी.7 / 10या व्यतिरिक्त जर तरुण जोडप्याचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी असेल तर त्यांची कमाई ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. जपानखेरीज इतरही अनेक देश आहेत, जिथे मुलांना जन्म देण्यास प्रोत्साहन म्हणून ही रक्कम दिली जाते. जपाननंतर इटलीमध्येही वेगाने जन्मदर घसरत आहे.8 / 10इटलीमध्ये प्रत्येक जोडप्याला मुल होण्यासाठी ७० हजार रुपये दिले जातात. युरोपियन देश एस्टोनियामध्ये जन्म दर वाढवण्याबरोबरच नोकरी करणाऱ्यांना दीड वर्षापर्यंत संपूर्ण पगारासह सुट्टी देण्यात येते. 9 / 10याशिवाय तीन मुलांच्या कुटुंबाला दरमहा २५,००० रुपयांचा बोनस मिळतो. इराणमधील सर्व रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना पुरुषांची नसबंदी करण्यास बंदी आहे. 10 / 10इराणमध्ये गर्भनिरोधक औषधे देखील अशा स्त्रियांना दिली जातात ज्यांना खरोखर त्यांची आवश्यकता आहे. इराणमध्ये अधिक मुलांना जन्म देणाऱ्या कुटुंबांना अतिरिक्त रेशन दिलं जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications