शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jara Hatke: सेम टू सेम! ट्विन्स व्हिलेज, या गावात जन्माला येतात सर्वाधिक जुळी मुलं, असं आहे त्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 4:59 PM

1 / 5
हे जग अनेक आश्चर्यांनी भरलेलं आहे. आपल्या देशात असा एक गाव आहे जिथे सर्वाधिक जुळी मुलं जन्माला येतात. या गावाचं नाव आहे कोडिनी, हे गाव केरळमधील मणप्पूरम जिल्ह्यात आहे. या गावात सर्वाधिक जुळी मुलं जन्माला का येतात ही बाब कुठल्याही रहस्यापेक्षा कमी नाही आहे. येथील २००० कुटुंबांमध्ये मिळून ४०० जुळी मुलं आहेत. त्यामुळे या गावाला ट्विन व्हिलेज म्हणून ओळखलं जातं.
2 / 5
द न्यूज मिनिटने दिलेल्या वृत्तानुसार या गावात राहणाऱ्या ४६ वर्षीय शमसाद बेगम सांगतात १९ वर्षांपूर्वी त्यांना जुळ्या मुली झाल्या. शमसाद ह्या लग्नानंतर पतीसोबत या गावात आल्या होत्या.
3 / 5
जुळी मुले कुणासाठी आनंदाचं कारण ठरतात तर कुणासाठी आर्थिक बोजा. ऑटोरिक्षा ड्रायव्हरचे काम करणारे अभिलाष यांनी सांगितले की, त्यांना दोन-दोन जुळी मुले झाली आहेत. अशा कुटुंबासाठी सरकारकडून कुठल्याही मदतीची योजना आखली गेलेली नाही. त्यामुळे चार मुलांचा खर्च भागवताना त्यांची आर्थिक स्थिती बिघडत आहे.
4 / 5
या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जुळी मुले जन्माला का येतात, हे समजून घेण्यासाठी अनेक नामांकित संस्थांनी संशोधन केले आहे. यामध्ये लंडन युनिव्हर्सिटी, हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉज, केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशियन स्टडीज यांचा समावेश आहे. हे रहस्य उलगडवण्यासाठी संशोधकांनी लाळ आणि केसांचे सँपल घेतले. त्यामाध्यमातून डीएनए तपासणीही केली.
5 / 5
केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशियन स्टडीजचे संशोधक प्रा. ई. प्रीतम यांनी सांगितले की, अनेक संशोधकांच्या म्हणण्यानुसार असे अनुवांशिक कारणांमुळे घडत असावे. वेगवेगळ्या संस्थांकडून करण्यात आलेल्या संशोधनामधून कुठलीही धक्कादायक बाब समोर आलेली नाही. ज्यामुळे या गावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जुळी मुलं नेमकी कशी जन्माला येतात.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेKeralaकेरळIndiaभारत