शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इथं शेकडो पक्षी करतात आत्महत्या; भारतातील रहस्यमय ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 10:49 PM

1 / 6
बर्म्युडा ट्रँगलची रहस्यमय गोष्ट तुम्ही ऐकली असेल. असंच एक ठिकाण दक्षिण आसाममध्ये आहे. जतिंगा खोऱ्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे अनेकजण चक्रावून जातात.
2 / 6
जतिंगा गावात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पक्षी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. कृष्ण पक्षातील रात्री अशा घटनांचं प्रमाण सर्वाधिक असतं.
3 / 6
या दिवसांमध्ये संध्याकाळी हवेत धुरकटपणा असतो. याशिवाय वारादेखील वेगानं वाहतो. संध्याकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत सर्वाधिक पक्षी आत्महत्या करतात.
4 / 6
आत्महत्या करणाऱ्या पक्षांमध्ये स्थानिक आणि प्रवासी पक्षांच्या ४० प्रजातींचा समावेश असतो.
5 / 6
यामागे अदृश्य शक्तींचा हात असल्याची चर्चा या भागात होते.
6 / 6
वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार या घटनांना परिसरातील हवामान कारणीभूत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडणाऱ्या पक्षांचं संतुलन बिघडतं. त्यामुळे झाडांना आदळून ते मृत्यूमुखी पडतात, असा वैज्ञानिकांचा दावा आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके