jessica bell and amelia lassetter friends grow up to become real life little mermaids
त्यांच्या हौसेची बातच न्यारी; लाखो रुपये खर्चून झाल्या जलपरी By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 3:51 PM1 / 7लहानपणी जलपरीच्या अनेक गोष्टी आपल्या ऐकलेल्या असतात. मात्र जलपरी खरंच प्रत्यक्षात अस्तित्वात असतात की नाही हे सांगणं कठीण आहे. मात्र ऑस्ट्रेलियातील दोन तरुणी जलपरी झाल्या आहेत. एखाद्या गोष्टीची हौस माणसांना काहीही करायला भाग पाडते हे या दोघींनी सिद्ध करून दाखवलं आहे. 2 / 7ऑस्ट्रेलियातील जेसिका बेल आणि अमेलिया लासेटर या दोन्ही तरुणींना जलपरी प्रचंड आवडत असल्याने त्या जलपरी झाल्या आहेत. 3 / 7कार्टूनमध्ये नेहमी असणारी जलपरी त्यांना इतकी आवडली की त्यांनी खऱ्या आयुष्यात जलपरी होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. जलपरी होऊन त्या ऑस्ट्रेलियातील समुद्रात शार्कसोबत पोहण्याचा आनंद घेतात. 4 / 7जेसिका बेल आणि अमेलिया लासेटर या दोघींनी जलपरी होण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. एक लाखाची सिलिकॉनपासून तयार करण्यात आलेली माशासारखी शेपटी त्यांनी लावली आहे. 5 / 7 समुद्रावर खूप जास्त प्रेम असल्याने अशापद्धतीने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतल्याच जेसिकाने म्हटलं आहे. अमेलिया ही जेसिकाची खास मैत्रीण असून तिची आवड आपल्यासारखीच असल्याच जेसिकाने म्हटले आहे. तसेच लहान मुलं यांना पोहताना पाहिल्यावर जलपरीच म्हणतात. 6 / 7फोटोग्राफीचे शिक्षण घेत असताना जेसिका आणि अमेलिया यांची चांगली मैत्री झाली. 2011 मध्ये अमेलियाला एका बीच फोटोशूटसाठी निवडण्यात आले त्यामध्ये ती जलपरी झाली होती. 7 / 7जेसिका आणि अमेलिया या दोघींनी जलपरी म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दोघी जलपरी होऊन अनेक बर्थ डे पार्टीमध्ये परफॉर्म करतात. तसेच लहान मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण देतात. आणखी वाचा Subscribe to Notifications