शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

JRD Tata Bairthday : एअर इंडियाच्या काउंटरवरील धूळ स्वत: साफ करायला लाजत नव्हते जेआरडी, 'या' गोष्टी वाचून व्हाल त्यांचे फॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 11:58 AM

1 / 14
भारतात सिव्हिल अॅव्हिएशनचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे जहांगीर रतन जी भाई टाटा म्हणजे जेआरडी टाटा यांची जयंती. ते आपल्या एअरलाइन्ससोबत अशाप्रकारे जोडले गेले होते की, एअरलाइन्सचं राष्ट्रीयकरण झाल्यावरही ते त्यासंबंधी काहीही करायला तयार असायचे. स्वातंत्र्यानंतर नेहरू सरकारने टाटा एअरलाइन्सचं राष्ट्रीयकरण करून त्याला एअर इंडिया केलं. तेव्हा जेआरडी टाटा या कंपनीने चेअरमन बनले होते.
2 / 14
आपल्या 'द टाटा ग्रुप: फ्रॉम टॉर्चबियरर्स टू ट्रेलब्लेजर्स' मध्ये लेखक शशांक शाह यांनी लिहिले की, जेआरडी टाटा एअर इंडियाचे अध्यक्ष असताना या कंपनीच्या बारीक सारिक गोष्टींवर लक्ष ठेवायचे. एकदा तर त्यांनी क्रू मेंबरसोबत टॉयलेटही स्वच्छ केलं होतं.
3 / 14
या पुस्तकात लल्लेख आहे की, जर त्यांना एअर इंडियाच्या काउंटरवर धूळ दिसली तर ते स्वत: ती धूळ स्वच्छ करत होते. ते प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत होते. मग ते प्लेनच्या आतील डेकोरेशन असो वा एअर होस्टेसच्या साडीचा रंग असो किंवा एअर इंडियाचं होर्डिंग असतो सर्व गोष्टींवर ते लक्ष ठेवून असायचे.
4 / 14
जेआरडी टाटा एक असं नाव आहे जे केवळ एक उद्योगपती नव्हते. त्यांनी विज्ञान, आरोग्य आणि उड्डाण विश्वात एक ठोस ओळख बनवली होती. २२ वर्षांचे असताना १९२६ मध्ये जेआरडी टाटा हे वडिलांच्या मृत्यूनंतर टाटा सन्सचे डायरेक्टर बनले.
5 / 14
त्यानंतर १२ वर्षांनी ते चेअरमन झालेत. २५ मार्च १९९१ पर्यंत ते या पदावर होते. जेआरडी टाटा यांचा जन्म २९ जुलै १९०४ ला पॅरिसमध्ये झाला होता. ते टाटा स्टीलचे संस्थापक जेएन टाटा यांचे पुतणे रतन जी दादाभाई टाटा आणि त्यांची फ्रान्सीसी पत्नी सूनी यांचा मोठा मुलगा होते.
6 / 14
फ्रान्समध्ये वाढलेले जेआरडी टाटा कधी कधी सुट्टींमध्ये मुंबईला येत होते. पुढे जाऊन ते १९२४ मध्ये व्यवसाय सांभाळण्यासाठी मुंबईला आलेत. त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये टाटा स्टीलचे प्रभारी निर्देशक जॉन पीटरसन यांच्या हाताखाली काम सुरू केलं.
7 / 14
जेआरडी टाटा यांच्या रूपाने टाटा घराण्याला एक असं नेतृत्व मिळालं ज्यांनी न्याय, कार्यस्थळावर नैतिकतासहीत अनेक सिद्धांत स्थापित केलेत. एकदा त्यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की, टाटा घराणं आपल्या सध्याच्या स्थितीपेक्षा अधिक मोठं राहिलं असतं. पण आपले प्रिय सिद्धांत सोडणं त्यांना जमत नाही. जेव्हा जेआडी टाटा यांनी कमान हाती घेतली तेव्हा टाटा घराण्याच्या १४ कंपनी होत्या.
8 / 14
त्यांच्या कार्यकाळात कंपनीची संख्या वाढून ९० वर पोहोचली. जेआरडी टाटा यांनी चेअरमन झाल्यावर सर्वच कंपन्यांना स्वायत्तता प्रदान केली. पण नैतिकतेच्या सिद्धांताचे पालन सुरूच राहिले. त्यांचं मत होतं की, मनुष्याचं महत्व मशीनांपेक्षा जास्त नाही, पण समान नक्कीच आहे.
9 / 14
टाटा स्टीलने परिवार नियोजन कार्यक्रमात देशात एक मिसाल कायम केली आहे. जी जेआरडी यांची देण आहे. यासाठी त्यांना संयुक्त राष्ट्र संघाने जनसंख्या पुरस्काराने सन्मानित केले. त्यांनी विज्ञान आणि कलेच्या विकासातही योगदान दिले.
10 / 14
त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेज, द टाटा मेमोरिअल कॅन्सर रिसर्च सेंटर अॅन्ड हॉस्पिटल, द टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, द नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हांस स्टडीजची स्थापना करण्यात भूमिका बजावली.
11 / 14
त्यांनी देशात विमान सेवा सुरू करण्यात मोठं योगदान दिलं. १९५३ ते १९७८ पर्यंत राष्ट्रीयकृत एअर इंडियाचे चेअरमन होते. सोबतच ते भारताचे पहिले कमर्शिअल पायलट होते. त्यांनी १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्स स्थापना केली. ज्याचं नाव नंतर एअर इंडिया झालं.
12 / 14
टाटा यांनी स्वत: कराची ते मुंबई उड्डाण घेतलं होतं. त्यानंतर पन्नास वर्षांनी ७८ वयाचे असताना त्यांनी पुन्हा सोलो उड्डाण घेतलं. जेणेकरून तरूणांमध्ये साहसाची भावना निर्माण व्हावी.
13 / 14
१९५५ मध्ये जेआरडी यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला होता. १९९१ मध्ये त्यांनी टाटा सन्सच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला. १९९२ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न देण्यात आला. पहिल्यांदाच हा पुरस्कार एका उद्योगपतीला देण्यात आला होता. ८९ वयाचे असताना २९ नोव्हेंबर १९९३ मध्ये स्वित्झर्लॅंडच्या जिनेव्हामध्ये त्यांचं निधन झालं.
14 / 14
जेआरडी आपल्या सभ्यतेसाठी, मोकळेपणासाठी आणि उदारतेसाठी नेहमी लक्षात राहतील. ते नेहमीच सत्तेच्या संपर्कात होते, पण कधी त्याने प्रभावित झाले नाही. चेअरमन असताना त्यांनी जमशेदपूरला विकसित शहर बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
टॅग्स :TataटाटाInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीbusinessव्यवसायAir Indiaएअर इंडिया