शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अत्याचाराबाबत वरचढ होता किम जोंग उनचा पिता, सिनेमाच्या प्रेमात अभिनेत्रीला केलं होतं किडनॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 6:59 PM

1 / 8
जगाच्या इतिहासात अनेक क्रूर हुकूनशहांनी भरलेला आहे. ज्यात चंगेज खान, हिटलर आणि सद्दाम हुसैनसारखी नावे चर्चेत असतात. तसेच नॉर्थ कोरियात आजही हुकूमशाही आहे. नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आपल्या देशात विचित्र नियम करून लोकांना दाबून ठेवतो. किम जोंग उनचे वडिलही हुकूमशहा होते. चला जाणून घेऊ किम जोंग उनचे वडडील किम जोंग इलबाबत एक विचित्र घटना. ज्यावरून हे समजतं की, तो कसा होता.
2 / 8
किम जोंग उनने आपल्या देशात इतर देशातील सिनेमे बघण्यावर बंदी घातली आहे. पण त्याचे वडील किम जोंग इल सिनेमांचे फार शौकीन होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, किम जोंग उनने सिनेमाच्या प्रेमात त्यावेळची दक्षिण कोरियातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री Choi Eun-hee ला किडनॅप केलं होतं.
3 / 8
Choi Eun-hee कडून जबरदस्ती सतत सव्वा दोन वर्षात १७ सिनेमे बनवून घेण्यात आले होते. असं सांगितलं जातं की, १९७० च्या दशकात दक्षिण कोरियात एकापेक्षा एक चांगले सिनेमे बनत होते. Choi Eun-hee आणि तिचा पती Shin Jeong-gyun दोघेही सिनेमासाठी प्रसिद्ध नावे होती. Shin Jeong-gyun सिनेमे बनवत होता. पण नंतर दुसऱ्या अभिनेत्रीसोबत अफेअरमुळे पती-पत्नीमुळे दरी निर्माण झाली होती.
4 / 8
असं सांगितलं की, अभिनेत्री Choi Eun-hee ला एका बिझनेस डीलसाठी Hong Kong ला बोलवण्यात आलं होतं. जिथे किम जोंग इलची माणसं आधीच उपस्थित होते. संधी मिळताच त्यांनी अभिनेत्रीला किडनॅप केलं आणि हुकूमशहासमोर हजर केलं.
5 / 8
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, अभिनेत्री Choi Eun-hee ला अशाप्रकारे ठेवलं जात होतं जशी ती नॉर्थ कोरियात आपल्या मर्जीने आली असेल. तेच नेहमीच किम जोंग इल अभिनेत्रीसोबत हसून फोटो काढत होते. याचा उल्लेख अभिनेत्रीवरील डॉक्युमेंट्रीमध्ये मिळतो.
6 / 8
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री Choi Eun-hee सोबतच तिच्या पतीलाही किम जोंग इलने किडनॅप केलं होतं. जेव्हा तिच्या पतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला Prison Camp मध्ये डांबण्यात आलं होतं. असे म्हणतात की, अभिनेत्री आणि तिच्या पतीला याची कानोकान खबर नव्हती की, त्यांना एकाच व्यक्तीने किडनॅप केलंय. त्यांना या अटीवर सोडण्यात आलं की, ते नॉर्थ कोरियासाठी सिनेमे बनवतील.
7 / 8
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीकडून सतत दोन ते तीन वर्ष काम करवून घेण्यात आलं. अभिनेत्रीला जबरदस्ती १७ सिनेमात काम करावं लागलं. असंही म्हटलं जातं की, तिला रात्री केवळ तीन तास झोपू दिलं जात होतं. तर तिच्याकडून सिनेमात अश्लील सीन्सही करवून घेतले जात होते.
8 / 8
असे म्हणतात की, १९८६ मध्ये European Film Festival मध्ये नॉर्थ कोरियाकडून किम जोंग इलने अभिनेत्री आणि तिच्या पतीला फेस्टिव्हलमध्ये पाठवलं होतं. त्यांच्यावर सतत नजर ठेवली जात होती. असं असलं तरी ते कसेतरी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले आणि त्यांनी अमेरिकेत शरण घेतली.
टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेKim Jong Unकिम जोंग उन