Kim jong Un sister Kim Yo Jong has to follow these clothing rules api
किम जोंग उनच्या बहिणीलाही फॉलो करावे लागतात कपड्यांबाबत 'हे' अजब नियम! By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 2:40 PM1 / 9उत्तर कोरियात असे अनेक नियम आहेत जे बाहेरील जगाला नेहमीच विचित्र वाटू शकतात. नियमांमध्ये हेअरस्टाईला कशी असावी पासून ते कपड्यांपर्यंत अनेक विचित्र नियम आहेत. हे नियम केवळ सामान्य लोकांनाच नाही तर किम जोंग उनची लहान बहीण किम यो जोंग हिलाही पाळावे लागतात. (Image Credit : freepressjournal.in)2 / 9कपड्यांसंबंधी नियम - उत्तर कोरियाचा शासक किम जोंग उनची लहान बहीण किम यो जोंग हिला अनेकजण देशातील सर्वात शक्तीशाली महिला मानतात. ती रूलिंग वर्कर्स पार्टीच्या सेंट्रल कमिटीची व्हॉइस डायरेक्टर आहे. तसेच ती अनऑफिशिअली तिच्या भावासाठी चीफ स्टाफ म्हणूनही काम करते.3 / 9किम जोंग ज्या मीटिंग किंवा दौऱ्यावर जातात तिथे ती असतेच. यावरून तिचं महत्व कळून येतं. पण असं असूनही किम यो जोंगला कपड्यांसंबंधी काही नियमांचं पालन करावं लागतं. हे नियम ती मीटिंग्स किंवा लोकांसमोर जाताना फॉलो करताना दिसते. (Image Credit : wikibio.in)4 / 9नो जीन्स नो टाइट पॅंट्स - किम यो जोंगला जीन्स किंवा टाइट पॅंट्स घालण्याची परवानगी नाही. हा नियम केवळ तिच्यासाठीच नाही तर उत्तर कोरियातील सर्वच महिलांसाठी आहे. जीन्सऐवजी किम यो जोंग स्कर्ट आणि त्यासोबत जॅकेट घालू शकते. अशाच पेहरावात तिला नेहमी बघितलं जातं. (Image Credit : biography.com)5 / 9स्कर्ट लेंथ आणि फिटिंग - स्कर्ट लेंथबाबत सांगायचं तर याबाबतही काही नियम तयार केले आहेत. किम यो जोंग केवळ असेच फॉर्मल स्कर्ट घालू शकते ज्यांची लेंथ गुडघ्यापर्यंत असेल. यात ती फार जास्त बदल करू शकत नाही. सोबतच तिला ब्लेजरची फिटिंग अशीच ठेवायची असते जी फिट दिसेल पण बॉडी हगिंग नसेल.6 / 9हील्स - किम जोंग उनची बहीण ही नेहमीच किटन किंवा ब्लॉक हील्समध्येच दिसते. ती कधीही स्टलेटोज, पंप्स, वॅजेज किंवा इतर कुठल्या फुटवेअरमध्ये दिसत नाही. ब्लॉक हील्समध्येही किम यो जोंगला याची काळजी घ्यावी लागते की, ती जास्त इंच उंच असू नये. उंची केवळ 2 किंवा 3 इंच इतकीच असावी. सोबतच फुटवेअरचा रंगही नेहमी काळा असतो. (Image Credit : Social Media)7 / 9रंग - किम यो जोंग ही कधीही ब्राइट कलरच्या कपड्यांमध्ये दिसत नाही. ती साधारणपणे ब्लॅक किंवा ग्रे ब्लेजर अॅन्ड स्कर्टमध्ये दिसते. तसेच ती ब्लॅक किंवा व्हाइट ब्लाउज वापरते. त्याऐवजी इतर दुसऱ्या रंगांच्या कपड्यांमध्ये तिला कमीच बघितलं गेलंय. 8 / 9काही दिवसांपूर्वी किम जोंग उन गंभीर आजाराने मृत्यूमुखी पडल्याची कथित बातमी समोर आली होती. त्यानंतर त्याचा एक फोटो समोर आला होता. पण यादरम्यान किम जोंग उन नंतर त्याची उत्तराधिकारी म्हणून किम यो जोंगकडे जग बघू लागलं होतं. पण अजूनही याबाबत चर्चा सुरू आहे की, किम जोंग उनचे समोर आलेले फोटो खरे होते की, खोटे.9 / 9किम जोंग उनची बहीण किम यो जोंग ही सर्वात जास्त चर्चेत आली ती एका फोटोबॉम्बमुळे. किम जोंग उन आणि डोनाल्ड टॅम्प यांच्या भेटीदरम्यान किम यो जोंगचा एक फोटो फारच व्हायरल झाला होता. तेव्हाच जगभरातील मीडियाने तिच्या विषयी माहिती प्रकाशित केली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications