King Frederick William I of Prussia tall soldiers Potsdam giants api
एका 'सनकी' राजाची अजब कहाणी, सैनिकांना त्यांच्या उंचीनुसार देत होता पगार! By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 1:58 PM1 / 11इतिहासात असे अनेक राजे होऊन गेलेत जे कोणत्या ना कोणत्या कारणाने जगभरात प्रसिद्ध झालेत. कुणी क्रुरतेसाठी ओळखले जातात तर कुणी त्यांच्या उदारतेसाठी. पण एक असाही राजा होऊन गेला जो त्याच्या विचित्र सनकीपणासाठी ओळखला जायचा.2 / 11या राजाची सनक अशी होती की, तो उंचीनुसार त्याच्या सैनिकांना पगार द्यायचा. म्हणज ज्यांचा पगार जास्त त्यांना जास्त पगार मिळत होता. हे ऐकायला नक्कीच अजब वाटतं, पण हे सत्य आहे. (Image Credit : Pixabay)3 / 11साधारण 250 वर्षाआधी पर्शिया नावाचं एक राज्य होतं. नंतर ते 1932 मध्ये जर्मनीमध्ये विलीन झालं. इथे फ्रेडरिक विलियम प्रथम हा राजा होता. त्याने 1713 ते 1740 पर्यंत इथे राज्य केलं. तसा तर तो शांत आणि दयावान राजा होता. 4 / 11पण त्याला त्याच्या सैन्याचा विस्तार करण्याची फारच आवड होती. असे सांगितले जाते की, तो राजा होण्याआधी प्रशाच्या सैन्यात साधारण 38 हजार सैनिक होते. ते नंतर वाढवून 83 हजार करण्यात आलेत.5 / 11राजा फ्रेडरिकला उंच सैनिकांबाबत फार जिव्हाळा होता. त्याच्याकडे उंच सैनिकांची एक वेगळी रेजिमेंट होती. ज्याला पॉट्सडॅम जाएंट्स असं नाव होतं. या रेजिमेंटमध्ये सर्व सैनिक सहा फूटापेक्ष जास्तच उंचीचे होते. यातील सर्वात उंच सैनिकाचं नाव जेम्स किर्कलॅंड होतं आणि तो सात फूट उंच होता.6 / 11राजा फ्रेडरिकची सर्वात खास बाब म्हणजे तो भलेही उंच सैनिकांनी सैन्यात भरती करत होता. पण तो कधीही युद्ध करत नव्हता. काही इतिहासकारांनुसार, तो केवळ दुसऱ्या राज्यांना घाबरवण्यासाठी असं करत होता. तो एक शांतिप्रिय आणि उदार राजा होता. इतर राजांशी देखील त्याचे चांगले संबंध होते.7 / 11राजा फ्रेडरिकचा हा शौक नंतर सनकमध्ये बदलला. असे म्हणतात की, तो त्याच्या उंच सैनिकांना नंतर विचित्र कामांना लावू लागला. जसे की, तो उदास असल्यावर 200 ते 300 सैनिक महालात बोलवून त्यांना नाचायला सांगत असे. तसेच तो आजारी पडल्यावर तो सैनिकांना त्याच्या महालात हत्यारं घेऊन मार्च करण्यास सांगत असे.8 / 11राजा फ्रेडरिकबाबत असेही सांगितले जाते की, त्याने एक खासप्रकारची रॅक तयार केली होती. जे सैनिक आधीच उंच होते त्यांना या रॅकमध्ये बांधून आणखी ओढलं जात होतं. जेणेकरून त्यांची उंची आणखी वाढावी. या नादात अनेक सैनिकांना जीव गमवावा लागला होता. (Image Credit : pinterest.com)9 / 11इतकेच नाही तर तो त्याच्या उंच सैनिकांना पर्शिया राज्यातील उंच महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती करत होता. जेणेकरून त्यातून जे बाळ जन्माला येईल तेही उंच होईल. 10 / 1131 मे 1740 मध्ये 51 व्या वर्षी राजा फ्रेडरिकचं निधन झालं. असे म्हणतात की, त्यावेळी त्याच्या खास रेजिमेंटमधील उंच सैनिकांची संख्या 3 हजार झाली होती. 11 / 11त्याच्या मृत्यूनंतरही अनेक वर्ष ही रेजिमेंट सक्रिय राहिली. पण 1806 मध्ये राजा फ्रेडरिकचा मुलगा फ्रेडरिक ग्रेटने ही रेजिमेंट बंद केली आणि सर्व सैनिकांना सामान्य सैनिकांमध्ये टाकलं. आणखी वाचा Subscribe to Notifications