शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रात्रीच्या अंधारात काढतात किन्नरची अंत्ययात्रा; माणसांपासून लपवलं का जातं? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 6:01 PM

1 / 10
किन्नरांचं खरं आयुष्य कसं असतं? त्यांच्या परंपरा, प्रथा जाणून घेण्यासाठी दिल्लीपासून जवळपास ३० किमी अंतरावर चंडीगड येथे किन्नरांचे मंदिर आहे. देशातील सर्वात जुनं किन्नरांचे मंदिर, याठिकाणी मोठमोठे स्कॉलर किन्नरांवर रिसर्च करण्यासाठी येतात.
2 / 10
दुपारी ३ वाजता मंदिराचा मुख्य दरवाजा उघडतो. त्याठिकाणी समोर गादीवर किन्नरांची गुरुमाता कमली विराजमान असतात. गादीजवळ पितळेच्या भांड्यात कमंडल ठेवले जाते. चहूबाजूने अत्तरचा सुगंध असतो. याठिकाणी मोठ्या संख्येने मंगळसूत्र बनवण्यात येत आहे.
3 / 10
तिथे असणारी एक किन्नर सुदीक्षा जी तामिळनाडूहून आलीय तिने सांगितले की, एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न आहे. कोविडमुळे २ वर्ष लग्न झालं नाही. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात होणार. त्याच्या तयारीत आहोत. जवळपास जगातील ५० हजार किन्नर लग्न करणार आहेत. त्यासाठी मंगलसूत्र बनवलं जात आहे.
4 / 10
किन्नरांवर अंत्यसंस्कार कसे केले जातात याबाबत सगळ्यांना जाणून घ्यायचं असते. याबाबत किन्नरांची गुरुमाता सांगते की, जो किन्नर ज्या धर्माचा असेल किंवा त्याची इच्छा जी असते त्यानुसार त्याला दफन किंवा दहन केले जाते.
5 / 10
किन्नरांची अंत्ययात्रा रात्रीच्या अंधारात का काढली जाते असा प्रश्न महंत मनिक्षा यांना विचारला तेव्हा सांगितले जाते की, किन्नर दररोज रात्री मरतात आणि सकाळी जन्म घेतात. शत्रूच्या मुलालाही देवाने किन्नर बनवू नये यासाठी आम्ही पडद्यात लपवून अंत्ययात्रा काढतो किंवा रात्रीच्या अंधारात नेतो.
6 / 10
किन्नरांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊ शकतात का? तर यावर अजिबात नाही असं उत्तर दिले जाते. किन्नरांच्या अंत्ययात्रेत कुणालाही येण्याची परवानगी नसते असं गुरुमाता म्हणते. किन्नरांच्या गुरुचा जो धर्म असतो तोच किन्नरचा धर्म असतो. साऊथच्या मंदिरात जास्त करून गुरू हिंदू असतात.
7 / 10
किन्नरांची कुलदेवता कोण? यावर माता कमली सांगतात की, गुजरातच्या मेहसाणा येथे बहुचारा माता मंदिर आहे. त्याठिकाणी कोंबड्यावर माता आहे. किन्नर याच देवीला कुलदेवता मानतो. अर्धनारेश्वर रुपात पुजतो. त्याठिकाणी प्रत्येक डेऱ्यात कोंबड्यावाली माताची मूर्ती ठेवली जाते.
8 / 10
गेल्या अनेक वर्षापासून किन्नर आखाड्याची मागणी केली जात होती. २०१६ मध्ये सिंहस्थ महाकुंभ मेळ्यात पहिल्यांदा उज्जैनच्या दसरा मैदानात किन्नरांची रॅली निघाली. त्याचं नेतृत्व किन्नर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी केले होते. ही पहिली वेळ होती जेव्हा किन्नराला साधूच्या वेशात लोकांनी पाहिले होते.
9 / 10
२०१८ मध्ये जुना आखाडाने किन्नरांना आखाडा बनवण्याची परवानगी दिली. त्यानंतर २०१९ च्या कुंभमेळ्यात किन्नरांचे शाही स्नानही झाले. सध्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी या किन्नर आखाड्याच्या अध्यक्षा आहेत. तर हिमांगी सखी यांना महामंडलेश्वर बनवण्यात आले आहे.
10 / 10
किन्नर महिलांचा ड्रेस का घालतात? यावर निर्मोही आखाडे महामंडलेश्वर हिमांगी सखी म्हणतात की,'आम्ही स्वत: ला अर्धनारीश्वरचे रूप मानतो. म्हणजेच अर्धा नर आणि अर्धा मादी. जोपर्यंत महिला ड्रेसचा प्रश्न आहे, ही परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. किन्नर महिलांच्या वेषात राहतात. अर्जुनाने आपल्या अज्ञातवासात एक किन्नर म्हणून स्त्रीचे रूप घेतले.