Kiss Day: The strangest record in the world, the couple set a record by kissing for 56 hours
Kiss Day: जगातील सर्वात विचित्र रेकॉर्ड, कपलने तब्बल ५६ तास किस करत बनवला रेकॉर्ड By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 4:15 PM1 / 10जगात अनेक विचित्र गोष्टींच्या नोंदी झाल्या आहेत. ज्यांच्या रेकॉर्डचाही यात समावेश आहे. जगातील सर्वात लांब चुंबन घेण्याचा विक्रम थायलंडमध्ये झाला.2 / 10व्हॅलेंटाईन वीकच्या किस डे दरम्यान हा विक्रम केला गेला. या चुंबनाचा विक्रम थायलंडमधील एका जोडप्याने केला आहे.3 / 10२०१३ मध्ये, १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान जगातील सर्वात लांब चुंबन नोंदवले गेले.4 / 10या जोडप्याने ५८ तास, ३५ मिनिटे आणि ५८ सेकंद एकमेकांचे चुंबन घेत विक्रम केला होता.5 / 10थायलंडच्या म्युझियम रिपल्स बिलीव्ह इट अँड नॉट की या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. व्हॅलेंटाईन वीकनिमित्त आयोजित या स्पर्धेत ९ जोडप्यांनी सहभाग घेतला होता.6 / 10या स्पर्धेत एका 70 वर्षीय जोडप्यानेही सहभाग घेतला होता. थायलंडमधील पटाया येथे झालेल्या या स्पर्धेत एक्काचाय तिरनारत आणि लक्ष्या तिरनारत या दाम्पत्याने विक्रम केला.7 / 10स्पर्धा जिंकल्यानंतर या जोडप्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचवेळी दोघांनाही रोख पारितोषिक आणि हिऱ्याची अंगठी आयोजकाकडून देण्यात आली.8 / 10आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही स्पर्धा जिंकणार्या जोडप्याने याआधीच किस करण्याचा विक्रम केला आहे. याआधीही या जोडप्याने 2011 मध्ये किस करण्याचा विक्रम केला आहे.9 / 10जे ४६ तास, २४ मिनिटे आणि ९ सेकंद चालले. त्यादरम्यान या जोडप्याची जगभरात चर्चा झाली.10 / 10२०११ आणि २०१३ मध्ये दोन रेकॉर्ड बनवल्यानंतर, हे जोडपे थायलंडमध्ये खूप प्रसिद्ध झाले आणि सेलिब्रिटींप्रमाणे त्यांचे फोटो-व्हिडिओ व्हायरल झाले. त्याचा विक्रम आतापर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications