शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कुणी आणि का घेतलं होतं जगातलं पहिलं चुंबन? जाणून घ्या किसच्या सुरूवातीचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 1:10 PM

1 / 12
Kissing History : सामान्यपणे किस म्हणजे चुंबनाचा विषय निघाला की, सगळ्यांचेच डोळे टवकारतात. तसा तर रोमान्स किंवा स्नेह यासोबत जोडलं जात असलेल्या चुंबनाची सुरूवात फारच रोचक आहे. तेच मधे असेही दिवस आले होते की, काही सरकारांनी यावर बंदी घातली होती.
2 / 12
मुद्दा जेवढ इंटरेस्टींग असतो, त्यावर चर्चाही तेवढ्या प्रकारे होईल. किसबाबतही असंच काहीसं आहे. एंथ्रोपोलॉजिस्ट वेगवेगळ्या थेअरी देतात की, चुंबनाची सुरूवात कशी आणि कुठे झाली. एक बाब सगळेच सांगतात की, किस एक दुर्घटना असेल. दुर्घटना जी पसंत केली गेली.
3 / 12
सुरूवातीला आई आपल्या बाळाला जेवण भरवण्याने होईल. प्राणी सुद्धा अन्नाचा पहिला घास आपल्या मुलांच्या तोंडात टाकत होते. हे अन्न चावलेलं तोंडातून तोंडात टाकलं जात होतं. याला प्रीमेस्टिकेशन फूड ट्रान्सफर म्हणतात. ह्यूमन इवॉल्यूशन अशाप्रकारेच झालं असेल. चिपांजिंमध्ये अजूनही असं होतं. चिंपांजी माता आपल्या मुलांचा लाड करताना त्यांना किसही करतात. तर असंही होऊ शकतं की, आपण आपल्या पूर्वजांना पाहून किस घेणं शिकलं असेल.
4 / 12
याची दुसरी थेअरी अशी आहे की, ज्यानुसार चुंबन म्हणजे किस एक अपघाताची देण आहे. टेक्सास ए अॅन्ड एम यूनिवर्सिटीचे एंथ्रोपोलॉजी विभागाने यावर एक मोठा अभ्यास केला आणि दावा केला की, हुंगताना आपण अचानक एकमेकांना किस केलं असेल. इथूनच सुरूवात झाली असेल. यात वजन यामुळेही आहे की, जुन्या काळात एकमेकांना भेटताना हुंगण्याचं चलन होतं. बऱ्याच समाजात हुंगणे एकप्रकारच अभिवादन होतं. हुंगतानाच अचानक एका जोडप्याने चुंबन घेतलं असेल. ही नवीन बाब आहे. हे त्यांना आवडलं असेल.
5 / 12
असं मानलं जातं की, चुंबनाची सुरूवात अशीच आणि तेही आपल्या देशात झाली आहे. नंतर प्राचीन ग्रीक भारतात आआले आणि परत जाताना चुंबनाची एक कॉन्सेप्टही आपल्यासोबत घेऊन गेले. अशाप्रकारे हे जगभरात पसरलं.
6 / 12
नेहमीच चुंबनाला प्रेम व्यक्ती करण्याच्या रूपात पाहण्यात आलं. पण असं मुळात नाहीये. कमीत कमी जुन्या काळात तर असं अजिबात नव्हतं. मध्यकालीन यूरोपमध्ये याकडे ग्रीटिंगच्या रूपात पाहिलं जातं. जे कमी पदाचे लोक मोठ्या पदावरील लोकांसोबत करतात. दोन बरोबरीचे लोक कपाळावर किंवा ओठांवर किस करतात. तर कमी हुद्दा असलेले लोक मोठ्या हुद्द्यावरील लोकांना हातावर किंवा कपड्यांवर किस करतात.
7 / 12
यानंतर चुंबनाचं रूप वाढत गेलं. किस जास्त इंटेन्स झाला. खासकरून ओठांवर चुंबन प्रेमाचं प्रतिक बनला. सध्या किसच्या ज्या स्वरूपावर फ्रान्सने आपला ठप्पा लावला. त्याची सुरूवात एखाद्या फ्रान्सच्या जोडप्या द्वारे झाली असेल. हा किस सगळ्यात फेमस आहे.
8 / 12
जवळपास एक दशकाआधीच या देशाने चुंबनाला आपल्या डिक्शनरीमध्ये सामिल केलं आणि एक नाव दिलं गलॉश. सोबतच हा दावा केला की, पहिल्या महायुद्धावेळी फ्रान्समध्ये वेळ घालवणाऱ्या अमेरिकन सैनिकांना त्यांचं हे गुपित माहीत पडलं आणि त्यांनी ते नंतर पसरवलं.
9 / 12
उदाहरण द्यायचं तर रोमन शासक टायबेरिअसने चुंबनावर बंदी घातली होती. कारण याने लैंगिक रोग पसरण्याचा धोका होता. शासकाचं गुपित खूप दूर पसरलं होतं. इजिप्तपासून ते इटली-जर्मनी आणि बेल्जिअम-स्वित्झलॅंडचा मोठा भाग त्यांच्या ताब्यात होता. म्हणजे या भागात किसवर बंदी होती. इथूनच गालावर किस करण्याचं चलन आलं. 17 व्या शतकात जेव्हा जगातील मोठी भाग प्लेगने जीव गमावत होता. तेव्हाही ब्रिटनसहीत अनेक देशांनी किसवर बंदी घातली होती. जे ऐकत नव्हते त्यांना दंड ठोठावला जात होता.
10 / 12
अमेरिका जो आता आपल्या खुलेपणा आणि लोकशाहीसाठी ओळखला जातो, तिथेही एकेकाळी असंच होतं. तिथेही किसिंगवर बंदी होती. ही बाब पहिल्या महायुद्धानंतरची आहे.
11 / 12
चुंबन ऐकताच सगळ्यांच्या मनात कोणती ना कोणती रोमॅंटिक पेंटिंग तयार होते. पण हे तेवढं रोमॅंटिक नाहीये. जेवढं आपण समजतो. कमीत कमी जगातील 54 टक्के लोकांना तर हेच वाटतं. अमेरिकी एंथ्रोपोलॉजिस्ट एसोसिएशन काही दिवसांआधी एक अभ्यास केला होता, ज्यात जगातील वेगवेगळ्य भागातील 168 संस्कृतींचा समावेश करण्यात आला होता. यातून समोर आलं की, केवळ 46 टक्के लोकच चुंबनाला रोमान्ससोबत जोडतात. खासकरून ओठांवरील किस. बाकी लोक चुंबनाला रोमान्स सोबत जोडण्यास नकार देतात.
12 / 12
जगात अनेक भाग असे आहेत जे चुंबनाला अजूनही खराब मानतात. जसे की, सोमालियामध्ये याकडे आजार पसवण्याच्या षडयंत्रासारखं पाहिलं जातं. तसेच बोलिवियामद्येही किसिंगवर बंदी आहे. कदाचित आजही एकमेकांना ओळखण्यासाठी किंवा प्रेम व्यक्ती करण्यासाठी ते हुंगण्याची पद्धत अवलंबतात.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके