Know about Alcatraz jail most dangerous prison in the world
जगातलं सर्वात खतरनाक तुरूंग, जेथून कधीच पळून जाऊ शकत नव्हते कैदी By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 5:00 PM1 / 11तुरूंग एक असं ठिकाण असतं जिथे चोरी, लुटमाऱ्या करणारे आणि कुख्यात गुन्हेगार यांना शिक्षा भोगण्यासाठी ठेवलं जातं. तुरूंगाचं नाव घेताच सर्वसामान्य लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागतात. कैद्यांना खाण्या-पिण्यापासून राहण्याची व्यवस्था अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 2 / 11काही तुरूंग हे कैद्यांसाठी चांगले मानले जातात तर काही कैद्यांबाबत आपल्या क्रूरतेसाठी ओळखले जातात. सामान्यपणे प्रत्येक तुरूंगातून कोणता ना कोणता कैदी पळून जाण्याची बातमी समोर येत असते. 3 / 11पण आज आम्ही तुम्हाला एका अशा खतरनाक तुरूंगाबाबत सांगणार आहोत, ज्याबाबत बोललं जातं की, या तुरूंगातून कधी कोणताही कैदी पळून जाऊ शकला नाही.4 / 11अलकाट्राज तुरूंग १९३४ मध्ये सुरू करण्यात आलं होतं. पण व्यवस्था आणि देखरेखीसाठी जास्त खर्च येत असल्याने हे तुरूंग १९६३ मध्ये बंद करण्यात आलं. आता या तुरूंगाचा वापर एका म्युझिअमसारखा केला जातोय. लाखोंच्या संख्येने लोक हा तुरूंग बघायला येतात. हा तुरूंग 'द रॉक'नावानेही ओळखला जातो.5 / 11कडक सुरक्षा व्यवस्था आणि चारही बाजूने सॅन फ्रान्सिस्कोची थंड पाण्याची खाडीने वेढलेल्या या तुरूंगाला अमेरिकेतील सर्वात मजबूत तुरूंग मानलं जातं. जेथून कधीही कोणताही कैदी पळून जाऊ शकला नाही. 6 / 11असं सांगितलं जातं की, या तुरूंगात अमेरिकेतील सर्वात खतरनाक कैद्यांना ठेवलं जात होतं. जेणेकरून ते पळून जाऊ नये. तरी सुद्धा तुरूंगाच्या २९ वर्षाच्या इतिहासात येथून एकूण ३६ कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. 7 / 11यातील १४ कैदी पकडले गेले होते. तर काही कैदी पोलिसांच्या गोळ्यांचे शिकार झाले आणि काही खाडीच्या थंड पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले. पाच कैद्यांचे तर मृतदेहही सापडले नाहीत.8 / 11असंही सांगितलं जातं की, जून १९६२ मध्ये या तुरूंगातून तीन कैदी फ्रॅंक मॉरिस, जॉन एंगलिन आणि क्लेरेंस एंगलिन पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. अनेक वर्षांनी पोलिसांना मिळालेल्या एका पत्रात याचा दावा करण्यात आला होता. 9 / 11त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पण पोलिसांच्या हाती असा कोणताही पुरावा लागला नाही की ज्याने हे स्पष्ट होईल की, ते पळून गेल्यावर जिवंत आहेत. जॉन एंगलिन आणि क्लेरेस एंगलिन या दोन्ही कैद्यांच्या घरच्यांनी देखील हा दावा केला होता की, ते दोघेही जिवंत आहेत. पण ते सापडले नाहीत.10 / 11या तुरूंगाला अमेरिकेतील सर्वात भयावह तुरूंगांपैकी एक मानलं जातं. इथे अनेक कैद्यांनी आत्महत्या केली होती. ज्यानंतर असा दावा केला जात होता की, त्यांच्या आत्मा इथे भटकतात. 11 / 11या तुरूंगाला अमेरिकेतील सर्वात भयावह तुरूंगांपैकी एक मानलं जातं. इथे अनेक कैद्यांनी आत्महत्या केली होती. ज्यानंतर असा दावा केला जात होता की, त्यांच्या आत्मा इथे भटकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications