Know about bikini history and women who first wore bikini api
बाबो! बिकीनी घालणारी जगातली पहिली मॉडल, रातोरात तिला आली होती 50 हजार पत्रे! By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 3:03 PM1 / 11आजच्या जमान्यात बिकीनी परिधान करणे ही एक सामान्य आणि फॅशनची बाब झाली आहे. सर्वसामान्य नागरिक असो वा सेलिब्रिटी कधी ना कधी आपल्याला बिकीनी परिधान केलेल्या बघायला मिळतात. पण ही बिकीनीची फॅशन कधी आणि कशी सुरु झाली हे अनेकांना माहीत नसेल. आज बिकीनी डे निमित्त बिकीनीचा इतिहास जाणून घेणार आहोत. 2 / 11फ्रेंचचे ऑटोमोबाईल इंजीनिअर आणि कपड्यांचे डिझायनर Louis Reard यांनी सर्वात पहिल्यांदा बिकीनी तयार केली होती. ही बिकीनी 5 जुलै 1946 मध्ये Micheline Bernardini लावाच्या मॉडेलने परिधान करुन सार्वजनिक केली होती. बिकीनीचं नाव हे bikni atoll या जागेच्या नावावरुन घेण्यात आलं होतं. याच जागेवर अणुबॉम्बची चाचणी होत होती. 3 / 11दुसऱ्या महायुद्धादरम्यान यूरोपची आर्थिक स्थिती ढासळली होती. असे सांगितले जाते की, या युद्धात वेगवेगळ्या देशांच्या जवळपास 10 कोटी सैनिकांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे यूरोपमध्ये खाण्याच्या वस्तू आणि कपड्याची कमतरता भासू लागली होती. 4 / 11त्यानंतर महिलांना स्वीमसूट कमी वापण्याचा आदेश दिला गेला. कारण यासाठी कापड जास्त लागत होता. फ्रेंचचे ऑटोमोबाईल इंजीनिअर आणि कपड्यांचे डिझायनर Louis Reard यांनी बिकीनी डिझाइन केली.5 / 11फ्रेंच महिलांना बिकीनी चांगलीच पसंत पडली होती. पण तेथील चर्चना याचं डिझाइन फार अपमानकारक वाटलं होतं. इतकेच नाहीतर तेथील मीडियानेही बिकीनीच्या डिझाइनला विरोध केला होता. बिकीनी तयार झाल्यावर एका महिन्यापर्यंत कोणत्याही अमेरिकन मॉडेलने प्रचार करण्यास नकार दिला होता. 6 / 11कारण त्यावेळी बिकीनी मार्केटमध्ये येताच स्पेन आणि इटलीने यावर बंदी घातली होती. तेव्हा कॅसीनो डी पेरिसमध्ये एक 19 वर्षीय फ्रान्सची पॉर्न डान्सर मिशेलाइन बर्नार्डिनीनने बिकीनीची जाहिरात केली. 7 / 11मिशेलाइनची बिकीनीची जाहिरात पाहून लोक तिच्या सुंदरतेचे चाहते झाले होते. तिला शेकडो पत्रे येऊ लागली होती. असे सांगितले जाते की, मिशेलाइनला दोन दिवसात 50 हजार पत्रे चाहत्यांकडून आली होती. त्यानंतर 1951 मध्ये झालेल्या पहिल्या मिस वर्ल्ड ब्युटी पेजंटच्या प्रतिस्पर्ध्यांनी बिकीनी घालून रॅम्प वॉक केला.8 / 11अभिनेत्री Bridget Bardot ने सर्वांचं लक्ष आपल्याकडे आकर्षिक तेव्हा 1953 मध्ये तिने कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये बिकीनी परिधान केली होती. त्यानंतर अनेक अभिनेत्री बिकीनीमध्ये दिसू लागल्या.9 / 11 तेच 1960 मध्ये playboy आणि sports illustrated नावाच्या मॅगझिनने बिकीनीचं डिझाइन आपल्या कव्हर पेजवर छापलं होतं. 10 / 1118व्या दशकात पहिल्यांदा बेदिंह सूटचं चलन वाढलं होतं. पूर्ण शरीर झाकण्यासाठी बेदिंह सूट उलन आणि कापसाचा तयार करण्यात येत होता. जाड फॅब्रिकमुळे हा सूट धुतल्यानंतर सुकण्यासाठी फार वेळ घेत होता. 20व्या शतकात पर्यटनाचा विकास होऊ लागला आणि बेदिंग सूटमध्ये बदल झाला. आता यात इलास्टिकचा वापर होऊ लागला. 11 / 111920 दरम्यान स्विमसूटने फार मॉडर्न लूक धारण केला होता. त्यावर वेगवेगळे डिझाइन दिसू लागले होते. आज बिकीनी फॅशन म्हणून सगळेच वापरतात. बॉलिवूड सिनेमांमध्ये तर याचा अधिक वापर होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications