Know about magical flying broom available in market, know the price and launching date
फिल्मी स्टाइल! मार्केटमध्ये येणार उडणारा जादुई झाडू, जाणून घ्या किंमत अन् कधी होणार लॉन्च... By अमित इंगोले | Published: November 07, 2020 12:30 PM1 / 9जर कुणाला सांगितलं की, मार्केटमध्ये उडणारा झाडू येणार आहे तर कुणालाही गंमत वाटेल. पण ही गंमत नाहीये. जर तुम्ही हॅरी पॉटर सिनेमा पाहिला असेल तर या उडणाऱ्या झाडूशी तुम्ही परिचीत असालच. आता हा झाडू केवळ सिनेमात नाही तर रिअल लाइफमध्येही लोकांमध्ये येणार आहे. फक्त फरक इतका आहे की हा झाडू मंत्राने किंवा जादूने नाही तर विजेवर उडणार आहे. हा झाडू रिअल फ्लाइंग ब्रूम प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आला आहे. हा झाडू तयार करणारी कंपनी नूव्हेमने स्पष्ट केलं आहे की, हा झाडू उडणार तर नाही, पण त्याची जाणीव नक्कीच होईल. 2 / 9या यूनिक प्रोजेक्टसाठी रूसोने आधी एक इलेक्ट्रिक मोटारसायकल घेतली आणि नंतर तिला जादुई ब्रूमस्टिकमध्ये रूपांतरित केलं. या झाडूची लांबी ५१ सेंटीमीटर आहे. सोबतच कार्बन स्टीलपासून हा तयार करण्यात आला असून वरून इलेक्ट्रोस्टेटिक पेंट लावला आहे.3 / 9बसण्यासाठी या झाडूवर सीट लावण्यात आली आहे. जेणेकरून बसणाऱ्यांना आराम मिळेल. सोबतच लोक ही सीट काढून त्यांच्यानुसार अॅडजस्ट करू शकतात. फिल्मी झाडूसारखाच हाही झाडू सहजपणे ऑपरेट करता येईल. हा झाडू पुढे नेण्यासाठी तुम्हाला समोरच्या बाजूने झुकावं लागेल तर मागे सरकल्यावर ब्रेक लागेल.4 / 9हा झाडू ४ डिझाइनमध्ये लॉन्च केला जाईल. सोबतच वेगवेगळ्या डिझाइनमध्ये वेगवेगळे फिचर्स दिले जातील. या झाडूच्या स्टाइलमद्येही खास लक्ष दिलं जाणार आहे. यात गोल्डचे तारही दिले आहेत जे फार आकर्षक दिसतात.5 / 9या उडणाऱ्या खास झाडूची विक्री मार्च २०२१ मद्ये सुरू होणार आहे. या झाडूसोबत तुम्हाला कंपनीची टी-शर्ट, दोन ट्राउजर, एक बेल्ट आणि एक सर्टीफिकेट मिळणार आहे.6 / 9आता याची किंमत किती असेल. तर कंपनीने घोषणा केली आहे की, या रिअल लाइफ एक्सपिरिअन्सला घरी घेऊन जाण्यासाठी केवळ ५ हजार रूपये खर्च करावे लागतील. 7 / 9आता याची किंमत किती असेल. तर कंपनीने घोषणा केली आहे की, या रिअल लाइफ एक्सपिरिअन्सला घरी घेऊन जाण्यासाठी केवळ ५ हजार रूपये खर्च करावे लागतील. 8 / 9आता याची किंमत किती असेल. तर कंपनीने घोषणा केली आहे की, या रिअल लाइफ एक्सपिरिअन्सला घरी घेऊन जाण्यासाठी केवळ ५ हजार रूपये खर्च करावे लागतील. 9 / 9आता याची किंमत किती असेल. तर कंपनीने घोषणा केली आहे की, या रिअल लाइफ एक्सपिरिअन्सला घरी घेऊन जाण्यासाठी केवळ ५ हजार रूपये खर्च करावे लागतील. आणखी वाचा Subscribe to Notifications