Know about mysterious Kiradu temple where people do not stop at night
राजस्थानमधील एक असं मंदिर, जिथे रात्री चुकूनही थांबत नाही लोक; कारण वाचून हैराण व्हाल By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 3:10 PM1 / 9जगभरात अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांबाबत अनेक रहस्य आहेत. एखादं मंदिर आपल्या अद्भूत निर्माणासाठी प्रसिद्ध आहे तर एखादं आपल्या विचित्र घटनांमुळे प्रसिद्ध आहे. खासकरून भारतात अशा रहस्यमय मंदिरांचा भरना जास्त आहे. 2 / 9आज आम्ही तुम्हाला एका अशा मंदिराबाबात सांगणार आहोत, जेथून सायंकाळी होताच लोक पळून जातात. रात्री तर इथे चुकूनही कुणी थांबत नाहीत. यामागचं कारण असं सांगितलं जातं की, जी व्यक्ती इथे रात्री थांबते, ती व्यक्ती दगड बनते.3 / 9आम्ही तुम्हाला सांगतो किराडू मंदिराबाबत. जे राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात आहे. किराडू मंदिराला राजस्थानचं खजुराहो सुद्धा म्हटलं जातं. दक्षिण भारतीय शैलीत तयार करण्यात आलेलं हे मंदिर आपल्या कलाकृतींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. असं सांगितलं जातं की, ११६१ ईसपू मध्ये या ठिकाणाचं नाव किराट कूप होतं.4 / 9किराडू पांच मंदिरांची एक श्रृंखला आहे. ज्यात विष्णु मंदिर आणि शिव मंदिरांची स्थिती थोडी ठीक आहे. पण इतर मंदिरांचं मोठं नुकसान झालं आहे. या मंदिरांचं निर्माण कुणी केलं हे कुणालाच माहीत नाही. 5 / 9पण मंदिरांची बनावट पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, कदाचित दक्षिणेतील गुर्जर-प्रतिहार वंश, संगम वंश किंवा गुप्त वंशाच्या काळात या मंदिराचं निर्माण झालं असावं.6 / 9अशी मान्यता आहे की, अनेक वर्षापूर्वी किराडूमध्ये एक सिद्ध साधू आपल्या शिष्यांसोबत आले होते. एक दिवस ते शिष्यांना तिथेच सोडून भ्रमणासाठी गेले होते. यादरम्यान एका शिष्याची तब्येत बिघडली. इतर शिष्यांनी गावातील लोकांना मदत मागितली. पण कुणीही मदत केली नाही.7 / 9नंतर काही वेळाने सिद्ध साधु तिथे परत आले आणि त्यांना सगळं काही समजलं. ते यावर रागावले आणि त्यांनी गावातील लोकांना श्राप दिला की, सूर्य मावळल्यानंतर सगळे लोक दगडाचे होतील.8 / 9आणखी एक अशीही मान्यता आहे की, एका महिलेने साधुच्या शिष्याची मदत केली होती. त्यामुळे साधु महिलेला म्हणाले होते की, सायंकाळ होण्यापूर्वी गाव सोडून निघून जा. आणि जाताना मागे वळून बघू नको. पण महिलेने ते ऐकलं नाही. तिने मागे वळून पाहिलं. ज्यानंतर ती दगड बनली. मंदिराच्या काही अंतरावरच या महिलेची मूर्ती आहे.9 / 9आणखी एक अशीही मान्यता आहे की, एका महिलेने साधुच्या शिष्याची मदत केली होती. त्यामुळे साधु महिलेला म्हणाले होते की, सायंकाळ होण्यापूर्वी गाव सोडून निघून जा. आणि जाताना मागे वळून बघू नको. पण महिलेने ते ऐकलं नाही. तिने मागे वळून पाहिलं. ज्यानंतर ती दगड बनली. मंदिराच्या काही अंतरावरच या महिलेची मूर्ती आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications