शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक असा किल्ला ज्यात दडला आहे अब्जावधीचा खजिना, पण आजपर्यंत कुणाच्या हाती लागला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 1:51 PM

1 / 10
भारतात राजांचे असे कित्येक किल्ले आहेत जे आपल्या खास कारणांसाठी लोकप्रिय आहेत. असाच एक किल्ला हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात आहे. हा किल्ला फारच रहस्यमय मानला जातो.
2 / 10
असे म्हणतात की, या किल्ल्यात एका अज्ञात जागेवर अब्जो रूपयांचा खजिना लपवलेला आहे. पण हा खजिना आजपर्यंत कुणीही शोधू शकलं नाही.
3 / 10
हा किल्ला सुजानपुरचा किल्ला या नावाने ओळखला जातो. किल्ल्यात कथितपणे असलेल्या खजिन्यामुळे याला हमीरपूरचा खजांची किल्ला असंही म्हटलं जातं.
4 / 10
हा किल्ला कटोच वंशाचा राजा अभय चंदने २६२ वर्षाआधी म्हणजे १७५८ मद्ये बनवला होता. त्यानंतर इते राजा संसार चंदने शासन केलं.
5 / 10
असे म्हणतात की, या किल्ल्यात आजही राजा संसार चंद यांचा खजिना आहे. पण या आजापर्यंत खजिन्याच्या रहस्यावरून कुणी पडदा उठवला ना कुणी खजिन्यापर्यंत पोहोचलं.
6 / 10
असं मानलं जातं की, किल्ल्याच्या आत एक पाच किलोमीटर लांब भुयार आहे. पण या भुयाराच्या टोकापर्यंत कुणीही पोहोचू शकलेलं नाही. रस्त निमुळता आणि अंधार असल्याने या भुयारात १०० मीटरपेक्षा जास्त आत जाण्याची कुणाची हिंमत झाली नाही.
7 / 10
सुजानपूर किल्ल्याच्या आसपास राहणारे लोक सांगतात की, रात्री या किल्ल्यातून विचित्र आवाज येतात. त्यांचा समज आहे की, खजिन्याची रक्षा किल्ल्यातील आत्मा करतात. याचा पुरावा कुणाकडेही नाही.
8 / 10
असं सांगितलं जातं की, राजा संसार चंद या किल्ल्याचा वापर लुटलेला खजिना लपवण्यासाठी करत होता. त्यासाठी त्याने किल्ल्यात एक भुयार तयार केला होता. ज्याचा रस्ता थेट खजिन्यापर्यंत जात होता.
9 / 10
हा लपवलेला खजिना शोधण्याचा प्रयत्न मुघलांसोबतच अनेक राजा-महाराजा आणि गावातील लोकांनी केला. काही लोक तर रहस्यमय भुयारातून जाण्याचाही प्रयत्न करून चुकले आहेत. पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही.
10 / 10
असे म्हणतात की, खजिन्याचं रहस्य राजा संसार चंदसोबत त्याच्यासोबतच दफन झालं. इतकंच काय तर त्याच्या परिवारातील एकाही सदस्याला हा खजिना मिळू शकला नाही.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेFortगड