know about spacex first commercial spaceship built for astronauts
परदेशी सहलींचा सोडा विचार; अंतराळ सफरीचं स्वप्न लवकरच होणार साकार By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 7:52 PM1 / 6स्पेस एक्सनं अंतराळात सफर करू शकणारं एक रॉकेट सोडलं होतं. हे रॉकेट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचलं. या रॉकेट अंतराळ सफरीचं सर्वसामान्यांचं स्वप्न लवकरच साकार होईल. 2 / 6स्पेस एक्सनं यशस्वीपणे अंतराळ सफर केली. मात्र यावेळी त्यात कोणीही नव्हतं. चाचणी घेतली जात असल्यानं एक डमी बसवण्यात आला होता. 3 / 6स्पेस एक्सनं या रॉकेटला ड्रॅगन नाव दिलं होतं. या रॉकेटनं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंतचं अंतर अतिशय सुखरुपपणे कापलं. त्यामुळे येत्या काळात अंतराळ यात्रा हा मोठा व्यवसाय ठरू शकतो.4 / 6स्पेस एक्सकडून नासाच्या योजनेच्या अंतर्गत यंदाच्या उन्हाळ्यात दोन जणांना अंतराळ यात्रेवर पाठवलं जाऊ शकतं. 5 / 6स्पेस एक्सनं ड्रॅगनमध्ये सेन्सर लावले आहेत. अंतराळ यात्रेदरम्यान माणसाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, याची नोंद सेन्सरमध्ये घेतली जाईल. 6 / 6स्पेस एक्सनं ड्रॅगनमध्ये बसवलेल्या डमीला रिपली असं नाव दिलं आहे. एलियनवरील एका चित्रपटात रिपली नावाचं एक पात्र होतं. स्पेस एक्सचं मुख्यालय कॅलिफॉर्नियात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications