Know about worlds 17 pandemic in the world inlcuding coronavirus myb
जगभरात 'या' १० महामारींमुळे झाला होता कोट्यावधी लोकांचा मृत्यू; जाणून घ्या कोणत्या? By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 5:59 PM1 / 11कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात मोठ्या प्रमाणावर झाला आहे. आत्तापर्यंत कोरोना व्हायरसमुळे जगभरातून दोन लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग पाळलं जात आहे. कोरोनाच्या महामारीआधी तब्बल १० महामारींमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊन लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. आज आम्ही तुम्हाला जगभरात हाहाकार पसरवलेल्या त्या माहामारींबद्दल सांगणार आहोत.2 / 11इ.स पूर्व ४३० मध्ये ग्रीसची राजधानी एथेंस मध्ये पहिल्यांदा महामारी आली होती. ही महामारी पेलोपोनेसियन या युद्धादरम्यान पसरली होती. यावेळी लीबिया, इथियोपियामधील सर्वाधिक नागरीकांचा मृत्यू झाला होता. या महामारीला कोणतंही नाव देण्यात आलं नव्हतं. 3 / 11इ.स १६५ मध्ये इटली आणि जर्मनीमध्ये में एंटोनिन प्लेगची महामारी पसरली होती. सुरूवातीला ही महामारी सैनिकांमध्ये पसरली त्यानंतर या आजाराचा शिरकाव संपूर्ण जर्मनीत झाला.4 / 11इ. स २५० मध्ये साइप्रियन प्लेग कार्थेजनंतर ही महामारी आफ्रिकेत पोहोचली. ताप, सर्दी, घसा दुखणं, ही या महामारीची सुरूवातीची लक्षणं होती. ही महामारी इथोपियातून पसरली होती.5 / 11इ. स ५४१ मध्ये जस्टिनियन प्लेगची महामारी पसरली होती. इतिहासातील सगळ्यात भयानक महामारीत या आजाराचा समावेश होतो. तात्कालीक सम्राट जस्टिनियन याच्या नावावरून 'जेस्टिनियन प्लेग' असं नाव या महामारीला देण्यात आलं होतं. जवळपास १० कोटी लोकांचा मृत्यू या महामारीमुळे झाला होता. 6 / 11११ व्या शतकात कुष्ठरोगाने युरोपात महामारीचं रुप घेतलं होतं. त्यानंतर युरोपात कुष्ठरोगासाठी रुग्णालयांची स्थापना करण्यात आली होती. या रोगाला हेन्सन रोगाच्या नावानेसुद्धा ओळखलं जातं. 7 / 11द ब्लॅक डेथ या माहामारीमुळे कोट्यावधी लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. जस्टिनियन प्लेगनंतरची सगळ्यात मोठी माहामारी होती. चीन, भारत, सीरियात पसरली होती. युरोपातील जवळपास ५० टक्के लोकसंख्येचा या आजारामुळे मृत्यू झाला होता.8 / 11१६६५ मध्ये बुबोनिक प्लेग नावाची माहामारी पसरली होती. या माहामारीमुळे लंडनच्या २० टक्के लोकसंख्येला मृत्यूचा सामना करावा लागला होता. या महामारीला थांबवण्यासाठी कुत्रे आणि मांजरींना मारण्यात आलं होतं. या महामारीनंतर लंडनमध्ये भीषण आग लागली होती. या आगीमुळे पाच लाखांपेक्षा जास्त लोकांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली. 9 / 11१८१७ मध्ये हैजा महामारी पसरली होती. त्यामुळे १० लाख लोकांचा मृत्यू झाला होता. हा आजार ब्रिटीश सैनिकांमध्ये सुद्धा पसरला होता. ही महामारी स्पेन, अफ्रिका, इंडोनेशिया, चीन, जापान, इटली, जर्मनी आणि अमेरिकेत पसरली होती. भारतातील लोकांना सुद्धा मृत्यूचा सामना करावा लागला होता. १८८५ मध्ये या आजारावर लस आल्यानंतर हा आजार नष्ट झाला.10 / 11१८५५ मध्ये प्लेगच्या महामारीची सुरूवात चीनमधून झाली. ही महामारी हळूहळू भारत आणि हाँगकाँगमध्ये पसरली. या महामारीमुळे जगभरातील दीड कोटीपेंक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. 11 / 11खसरा माहामारीमुळे ४० हजार लोकांचा मृत्यू झाला होता. ब्रिटीश साम्राज्यातून ही माहामारी ऑस्ट्रेलियात पसरली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications