शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१५ राण्या आणि अब्जावधींची संपत्ती असलेला राजा माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 5:08 PM

1 / 9
एक असा देश ज्या देशाची लोकसंख्या जवळपास १३ लाख इतकी आहे. या ठिकाणचे ६३ टक्के लोक हे गरीबीत जगत आहेत. इथे राहत असलेल्या लोकांकडे खायला पोटभर अन्न सुध्दा नाही, तसंच पैसे सुध्दा या लोकांकडे नसतात. पण या ठिकाणच्या राजाकडे अब्जावधी संपत्ती आहे. ही संपत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
2 / 9
या देशाचं नाव 'द किंगडम ऑफ इस्वातिनी' आहे. ज्या भागाला सगळ्यात आधी स्वाजीलॅण्ड या नावाने ओळखलं जात होतं.
3 / 9
स्वाजीलॅण्ड हा एक आफ्रीकन देश आहे. हा प्रदेश १७ हजार ३६० किलोमीटर इतक्या भागात पसरला आहे. या देशाला रहस्यांनी भरलेला देश असं सुध्दा म्हटलं जातं.
4 / 9
इथला राजा तिसरा मस्वाती जगातल्या सगळ्या श्रीमंत राजांमध्ये गणला जातो. या राजाकडे १४ अब्जांपेक्षा जास्त संपत्ती आहे. तसेच या राजाकडे १९ रॉल्स रॉयस, २० मर्सिडीज आणि १२ बी एम डब्लू आहेत. याव्यतिरीक्त एक विमानतळ आणि जेट विमान सुध्दा आहेत.
5 / 9
या देशात दरवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 'उम्हलांगा सेरेमनी' फेस्टिवल असतो. या फेस्टिवलमध्ये १० हजारांपेक्षा जास्त अविवाहात मुली असतात. नॅशनल जीओग्राफीच्या रिपोर्टनुार या मुलींमधूनच राजा एखाद्या मुलीला आपली राणी म्हणून पसंत करतो. या मुली राजासमोर अर्धनग्नावस्थेत नृत्य करतात.
6 / 9
इस्वातिनी या देशात अनेक नियम असतात. त्याठिकाणी जर मुली लग्नाआधी गरोदर राहील्या तर त्या मुलीच्या कुटूंबीयांना दंड भरावा लागतो. यात एक गाय त्या कुटूंबाला राजाच्या हवाली करावी लागते.
7 / 9
राजा मस्वाती याने १९८६ पासून कारभार सांभाळायला सुरूवात केली. तसंच जेव्हा राजा तिसरा मस्वाती हा १८ वर्षांचा होता. तेव्हा तो जगातला सगळ्यात तरूण राजा होता.
8 / 9
५१ वर्षीय असलेल्या राजा मस्वातीने आत्तापर्यंत १५ लग्न केली आहेत. तसंच त्याची २३ अपत्य आहेत. त्यातल्या फक्त दोन राण्यांना राजेशाही थाट मिळाला.
9 / 9
राजा तिसरा मस्वती याने भारताला सुध्दा भेट दिली आहे. हा राजा आपला पत्नी आणि १०० नोकरांसमवेत दिल्ली येथील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहीला होता. त्यांनी २०० खोल्या बुक केल्या होत्या. तसंच ज्या हॉटेलमध्ये राजा तिसरा मस्वती राहीला होता त्या ठिकाणंचे प्रति दिवसाचे भाडे दीड लाख रूपये होते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके