Know the man who done this big eye paintings
आकर्षक मोठ्या डोळ्यांची चित्रकला पाहून व्हाल अवाक्, कशी काढली आहेत चित्र नक्की बघा... By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 2:52 PM1 / 11भोपाळमधील स्वराजविधी या आर्ट गॅलेरीत मंजुनाथ माने या चित्रकाराचे मानवी डोळे या थिमवर आधारीत असलेल्या चित्रकलेच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. 2 / 11मंजुनाथ माने यांच्या चित्रकलेच्या प्रदर्शनाची सुरूवात कर्नाटक येथून झाली.3 / 11कर्नाटक सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ कन्नड़ अॅण्ड कल्चर यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात मंजुनाथ माने यांची १२ चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. 4 / 11 या प्रदर्शनातील एका चित्रात कर्नाटकच्या ग्रामीण भागातील लोकांची वेशभूषा, तसेच महिलांचे शृंगार करण्याच्या पारंपारीक पध्दती दिसून येतात.5 / 11दसरा असताना म्हैसूर मधील हम्पी मंदिरात जमलेले लोकं आणि त्यांचा उत्साह या चित्रातून दिसून येतो.6 / 11या सगळ्या चित्रांमध्ये वेगवगळ्या रंगांचा वापर केला आहे. पण या चित्रांमध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी आहेत ते म्हणजे चित्रात रेखाटलेल्या माणसांचे डोळे. 7 / 11ही चित्र फारच मोठी आहेत, त्यात वेगवेगळे प्रसंग मांडले आहेत.8 / 11या चित्रांमधल्या मोठ्या डोळ्यांमागचे कारण सांगताना मंजुनाथ सांगतात की माझे स्वतःचे डोळे लहानपणापासूनच खूप मोठे आहेत. 9 / 11लहानपणापासून मला प्रत्येक व्यक्ती माझ्या डोळ्यांबद्दल विचारत असत. असं मंजुनाथ चित्रांबद्दल बोलताना म्हणाले.10 / 11डोळे सुध्दा व्यक्तीमत्त्वातील महत्वाचा भाग असतो, काही प्रेमळ तर काही रागीट चित्र पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे डोळे मोठे रेखाटत असल्याचे त्यांनी सांगितले.11 / 11चित्र पाहणाऱ्याचे व्हिजन हे मोठे असावे म्हणून त्यांनी मोठ्या डोळ्यांचे चित्र काढायचा संकल्प केला. आणखी वाचा Subscribe to Notifications