Know the mystery of Kamrunag lake where unknown treasure is stored api
'या' तलावात दडला आहे अब्जो रूपयांचा खजिना, समोर दिसतो पण काढता येत नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 9:59 AM1 / 10आजपर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळ्या खजिन्यांबाबतचे किस्से-कथा ऐकल्या किंवा वाचल्या असतील. अनेकदा हे खजिने जमिनीच्या पोटात असतात तर अनेकदा यांचा शोध समुद्राच्या तळात घेतला जातो. 2 / 10पण कधी तुम्ही अशा तलावाबाबत ऐकलंय का ज्यात अब्जो रूपयांचा खजिना आहे? जर ऐकलं किंवा वाचलं नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्या तलावाबाबत सांगणार आहोत.3 / 10हा अनोखा आणि प्रसिद्ध तलाव हिमाचल प्रदेशातील मण्डी जिल्ह्यापासून 60 किलोमीटर दूर रोहांडाच्या घनदाट जंगलांमध्ये आहे. या तलावाला कमरूनाग तलाव म्हणून ओळखलं जातं.4 / 10असे म्हणतात की, या तलावात फार पूर्वीपासून अब्जो रूपयांचा खजिना दडलेला आहे. पण आजपर्यंत कुणीही हा खजिना काढण्याची हिंमत करू शकलेलं नाही. याचंही कारणही आश्चर्यजनक आहे.5 / 10इथे एक फार प्रसिद्ध मंदिर आहे आणि या मंदिराच्या बाजूलाच हा कमरूनाग तलाव आहे. असे मानले जाते की, जे भक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात ते या तलावात सोन्या-चांदीचे दागिने आणि पैसे टाकतात.6 / 10या तलावात सोन्या-चांदीचे दागिने आणि पैसे टाकण्याची ही प्रथा फार पूर्वीपासून चालत आहे. या प्रथेच्या आधारावरच असं मानलं जातं की, या तलावात आतापर्यंत अब्जो रूपयांचा खजिना जमा झाला असेल.7 / 10असेही मानले जाते की, तलावातील हा खजिना देवांचा आहे. काही मान्यतांनुसार, या तलावाची रक्षा एक मोठा साप करतो. जे कुणी या तलावातील धन काढण्याचा प्रयत्न करतो त्याला साप मारतो.8 / 10या सापाच्या भीतीमुळेच आजपर्यंत या तलावातील एक पैशालाही कुणी हात लावू शकलं नाही किंवा चोरी करू शकलं नाही.9 / 10लोकांमध्ये अशीही मान्यता आहे की, हा तलाव थेट पाताळात जाते आणि त्यामुळे या तलावात उतरण्याची कुणी हिंमत करत नाही.10 / 10इथे जे लोक येतात ते मनोकामना घेऊन येतात आणि देव त्यांची ही मनोकामना पूर्ण करतात. हे लोक पुन्हा येऊन या तलावात सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications