शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X असा साइन का लिहिलेला असतो? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 3:34 PM

1 / 8
तुम्ही बालपणापासून आतापर्यंत अनेकदा ट्रेनने प्रवास केला असेल आणि अजूनही करत असाल. ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा आत आणि बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे साइन पाहिले असतील.
2 / 8
एक महत्त्वाचं साइन म्हणजे ट्रेनच्या शेवटच्या डब्यामागे असलेलं X हे साइन. सर्वांच्या मनात अनेकदा हा प्रश्न आला असेल की, या X चा नेमका काय अर्थ असावा?
3 / 8
railmitra.com या रेल्वेसंबंधी माहिती देणाऱ्या वेबसाइटनुसार, भारतात चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनच्या मागे पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगात X हा साइन काढलेला असतो. हा साइन सर्वच पॅसेंजर ट्रेनच्या मागे असणे गरजेचे आहे.
4 / 8
हा नियम भारतीय रेल्वेनेच केला आहे. यासोबतच तुम्ही हे पाहिलं असेल की, काही ट्रेनवर एलव्ही असंही लिहिलं असतं. सोबतच ट्रेनच्या मागे लाल रंगाचा लाइटही ब्लिंक करत असतो.
5 / 8
ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर एलव्ही लिहिण्याचा अर्थ असा की, हा डबा ट्रेनचा शेवटचा डबा आहे. हा एलव्ही नेहमी X या साइनने लिहिला जातो.
6 / 8
प्रत्येक ट्रेनच्या मागे X चा साइन हा कर्मचाऱ्यांसाठी संकेत असतो की, हा शेवटचा डबा आहे. जर एखाद्या ट्रेनच्या मागे असं लिहिलेलं नसेल तर याचा अर्थ हा होतो की, ट्रेन आपातकालिन स्थितीत आहे.
7 / 8
प्रत्येक ट्रेनच्या मागे X चा साइन हा कर्मचाऱ्यांसाठी संकेत असतो की, हा शेवटचा डबा आहे. जर एखाद्या ट्रेनच्या मागे असं लिहिलेलं नसेल तर याचा अर्थ हा होतो की, ट्रेन आपातकालिन स्थितीत आहे.
8 / 8
हा लाइट खराब वातावरणात कर्मचाऱ्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करतो. तसेच या लाइटने मागून येणाऱ्या ट्रेनला सुद्धा इशारा मिळतो.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके