शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'ही' आहे जगातली दुसरी सर्वात खोल गुहा, फोटो पाहूनच येईल चक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 3:11 PM

1 / 5
जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जी आपल्याला थक्क करून सोडतात आणि आश्चर्यजनक वाटतात. असंच एक ठिकाण जॉर्जियाच्या अबखाजियामध्ये आहे. इथे जगातली दुसरी सर्वात खोल गुहा आहे. ही गुहा इतकी खोल आहे की, वरून पाहिल्यावरच भीतीने अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही.
2 / 5
या गुहेचं नाव क्रुबेरा गुहा आहे. या गुहेची खोली २१९७ मीटर म्हणजे ७२०८ फूट इतकी आहे. तशी तर इथे पर्यटकांची गर्दी नेहमीच असते. पण फारच दुर्गम परिसर आहे. त्यामुळे इथे जाण्यायोग्य वेळ वर्षातील केवळ चार महिनेच असतो. (Image Credit : wikimonks.com)
3 / 5
क्रुबेरा गुहेचा शोध १९६० मध्ये लावण्यात आला होता. या गुहेला वोरोन्या गुहा या नावानेही ओळखले जाते. वोरोन्याचा अर्थ होतो कावळ्यांची गुहा. हे नाव पडण्याचं कारण म्हणजे जेव्हा १९८० मध्ये पहिल्यांदा या गुहेत प्रवेश करण्यात आला तेव्हा इथे खूप सारी कावळ्यांची घरटी आढळली होती.
4 / 5
तसे तर या गुहेत वैज्ञानिकांच्या अनेक टीम संशोधनासाठी गेल्या होत्या. पण २०१२ मध्ये वेगवेगळ्या देशातील ५९ वैज्ञानिकांची एक टीम यात उतरली होती. तेव्हाच या गुहेची खोली २१९७ मीटर म्हणजे ७२०८ फूट मोजली गेली. या टीमने या गुहेत एकूण २७ दिवस मुक्काम केला होता. (Image Credit : mymodernmet.com)
5 / 5
या गुहेत जाण्यासाठी लोकांना सहजासहजी परवानगी मिळत नाही. झालं असं की, अबखाजियाने १९९९ मध्ये स्वत:ला जॉर्जियापासून वेगळं स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं होतं. पण तिकडे जॉर्जिया अजूनही या भागाला आपला भाग मानतं. त्यामुळेच या ठिकाणाबाबत नेहमीच मतभेद सुरू असतात. त्यामुळेच पर्यटकांना देखील अडचणींचा सामना करावा लागतो.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स