शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रक्ताने आंघोळ करण्यासाठी 600 तरूणींची या महिलेने केली होती हत्या, यामागचं कारण होतं विचित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 10:58 AM

1 / 8
इतिहासातील असे अनेक किस्से, अशा अनेक घटना आहेत ज्या वाचल्यावर हैराण व्हायला होतं. त्यात किस्से तर फारच धक्कादायक असतात. अशाच एका महिलेबाबत आज आम्ही सांगणार आहोत. ती इतकी क्रूर होती की, त्याची कल्पनाही केली नसेल. ही महिला अविवाहित तरूणींची हत्या करून त्यांच्या रक्ताने आंघोळ करत होती. त्याचं कारणही विचित्रच होतं. ही महिला इतिहासातील सगळ्यात क्रूर महिला म्हणून ओळखली जाते.
2 / 8
एलिजाबेथ बाथरी या महिलेचं नाव होतं. ती एक निर्दयी महिला सीरिअल किलर म्हणून ओळखली जात होती. एलिजाबेथ बाथरीने १५८५ ते १६१० दरम्यान ६०० पेक्षा अधिक तरूणींची हत्या करून त्यांच्या रक्ताने आंघोळ केली होती.
3 / 8
एलिझाबेथने या तरूणींची हत्या तिच्या महालातच केली होती. एलिझाबेथ ही हंगरी साम्राज्यातील उच्चभ्रू बाथरी परिवारातील होती. तिचं लग्न फेरेंक नॅडेस्डी नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. ही व्यक्ती तुर्की विरोधात युद्धातील हंगरीचा नॅशनल हिरो होता.
4 / 8
एलिझाबेथ बाथरीचा पती जिवंत होता, तेव्हाही ती तरूणींना तिची शिकार बनवत होती. पण १६०४ मध्ये त्याच्या मृत्युनंतर तिने जणू हत्या करण्याचा सपाटाच लावला होता. एलिझाबेथ स्लोवानियाच्या चास्चिस येथील तिच्या महालात राहत होती. तिथेच ती या तरूणींची हत्या करत होती.
5 / 8
असे सांगितले जाते की, एलिझाबेथ बाथरीला तिच्या या भयानक गुन्ह्यात तिचे तीन नोकर मदत करत होते. ती एका उच्चभ्रू परिवारातील होतील म्हणून ती आजूबाजूच्या गावातील गरीब मुलींना चांगले पैसे देऊन कामाचं आमिष दाखवून महालात बोलवत होती. पण या तरूणी महालात येताच तिच्या शिकार ठरत होत्या.
6 / 8
असे सांगितले जाते की, एलिझाबेथ आधी तरुणींना शारीरिक त्रास देत होती. त्यांना मारत होती, इतकेच काय तर त्यांचे हात कापत होती किंवा जाळत होती. अनेकदा ती काही तरूणींच्या शरीरावरील मांस दातांनी तोडून काढत होती आणि शेवटी त्यांची हत्या करून त्यांचं रक्त एका टबमध्ये भरून त्यात आंघोळ करत होती. याचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे.
7 / 8
असेही म्हटले जाते की, जेव्हा आजूबाजूच्या गावातील गरीब मुलींची सख्या कमी झाली तेव्हा तिने श्रीमंत घरातील मुलींना आपली शिकार बनवणे सुरू केलं होतं. हे बाब जेव्हा हंगरीच्या राजाला कळाली तेव्हा त्याने याची चौकशी करण्याचा आदेश दिला. तेव्हाच याचा खुलासा झाला. चौकशी करणाऱ्या पथकाला एलिझाबेथच्या महालातून मुलींचे सांगाडे आणि सोन्या-चांगीचे दागिणे सापडले होते.
8 / 8
१६१० मध्ये एलिझाबेथ बाथरीला तिच्या या भयंकर कृत्यासाठी अटक करण्यात आली आणि तिला तिच्यात महालातील एका खोलीत कैद करण्यात आलं. तिथे चार वर्षांनी २१ ऑगस्ट १६१४ मध्ये तिचा मृत्यू झाला. असेही म्हणतात की, एलिझाबेथ फार सुंदर होती आणि तिला तिचं हे सौंदर्य कायम ठेवायचं होतं. या कारणानेच तिने ६०० तरूणींची हत्या केली होती. तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी ती रक्ताने आंघोळ करत होती.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके