The largest cemetery in the world, it looks like a city, but 5 million bodies are buried here
जगातलं सर्वात मोठ्ठ कब्रस्तान, बघितल्यावर वाटतं जसं एखादं शहर, पण येथे दफन आहेत ५० लाख मृतदेह By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 5:25 PM1 / 10या फोटोत दिसणारं हे ठिकाण कोणतं शहर नसून दफनभूमी आहे. या दफनभूमीचं नाव आहे, वादी-ए-सलाम (Wadi al-Salam cemetery)2 / 10वादी-ए-सलाम (Wadi al-Salam cemetery) ही जगातील सर्वात मोठी दफनभूमी आहे.3 / 10इराकच्या नजफ या ठिकाणी असलेल्या वादी-ए-सलाम दफनभूमीला शांततेचं खोरं असंही म्हटलं जातं.4 / 10ही दफन भूमी शिया समुहाचं पवित्र शहर असलेल्या नजफमध्ये आहे.5 / 10वादी-ए-सलाम दफनभूमी 1,485.5 एकर म्हणजेच 6 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेली आहे.6 / 10या ठिकाणी 50 लाख पेक्षा अधिक लोकांना दफन करण्यात आलंय. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे तर इथं यापेक्षा कितीतरी अधिक पटीने मृतदेह आहेत.7 / 10नजफमधील ही दफनभूमी इमाम अली इब्न अबी तालिब (Imam Ali ibn Abi Talib) चौथे सुन्नी खलिफा आणि पहिले शिया इमाम यांच्या दरगाहजवळ आहे.8 / 10जगभरातील शिया लोकांचा स्वतःला मृत्यूनंतर वादी-ए-सलाममध्ये दफन व्हावं अशी इच्छा असते.9 / 10या दफनभूमीत तळघरांमध्ये मृतदेह ठेवले जातात. प्रत्येक तळघरात 50 मृतदेह या प्रमाणे ही व्यवस्था असते. यामुळे तिथं स्वच्छता ठेवता येते. 10 / 10मागील 1400 पेक्षा अधिक वर्षांमध्ये इथं लाखो जणांना दफन करण्यात आलेय. त्यामुळे त्यांची मोजदादच नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications