शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' देशात आहे जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर, पण राहत नाही कुणी हिंदू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 2:05 PM

1 / 6
जगातल्या अनेक देशांमध्ये प्रसिद्ध मंदिरं आहेत. एक देश असाही आहे जिथे जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे आणि सर्वात मोठं धार्मिक स्मारक आहे. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, इथे कुणीही हिंदू राहत नाही. या देशाच्या झेंड्यामध्ये हिंदू मंदिराचं चिन्ह आहे. हिंदू धर्म जगातला एकमेव असा धर्म आहे जो सर्वात प्राचीन आहे. असं मानलं जातं की, हिंदू धर्म १२ हजार वर्ष जुना आहे. हिंदू धर्मात मूर्ती पूजा आणि ध्यानाला फार महत्व आहे.
2 / 6
अंकोरवाट हे मंदिर जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे. त्यासोबतच हे जगातलं सर्वात मोठं धार्मिक स्मारक आहे. हे मंदिर कंबोडिया देशाच्या अंकोरमध्ये आहे. अंकोर सिमरिप शहराच्या मीकांग नदी किनारी आहे. हे भगवान विष्णुचं मंदिर आहे. इथे आधीच्या शासकांनी मोठमोठे भगवान शिवाची मंदिरे बनवली होती. या ठिकाणाचं जुनं नाव यशोधपूर होतं. राजा सूर्यवर्मन द्वितीयच्या शासन काळात या मंदिराचं निर्माण झालं होतं.
3 / 6
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, कंबोडियामध्ये जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे. पण १०० हिंदू धर्म मानणारे हिंदू लोक कुठे गेले. इथे सर्वात मोठं हिंदू मंदिर तर आहे, पण कुणी हिंदू नाही. इतिहासानुसार, येथील लोकांनी दुसरे धर्म स्वीकारले. सध्या या देशात बोटावर मोजण्या इतके हिंदू आहेत, पण जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर याच देशात आहे.
4 / 6
दक्षिण पूर्ण आशियातील एक प्रमुख देश कंबोडिया आहे आणि येथील लोकसंख्या साधारण १.७ कोटी आहे. ईस्ट आशियात ५ हजार ते १ हजार वर्ष जुन्या मंदिरांचा शोध लावण्यात आला आहे. या रिसर्चमध्ये भारताच्या प्राचीन वैभवशाली संस्कृतीची झलक बघायला मिळते. वैज्ञानिकांनी हे मान्य केलं की, हजारो वर्षात समुद्राची पाणी पातळी साधारण ५०० मीटर वाढली. याने हे सिद्ध झालं की, राम-सेतू, द्वारका नगरी सारखी ठिकाण आजही आहेत आणि यांच्यांशी संबंधित पात्रही खरे आहेत.
5 / 6
असं सांगितलं जातं की, खूप आधी कंबोडियामध्ये प्राचीन धर्म होता. आधी याचं संस्कृत नाव कंबुज किंवा कंबोज होतं. कंबोजच्या प्राचीन कथांनुसार, आर्यदेशाचे राजा कंबु यांनी भगवान शिवाच्या प्रेरणेने राजा कंबु स्वयांभव कंबोज देशात आले होते. त्यांनी इथे नाग जातीच्या राजांच्या मदतीने या जंगलात राज्य वसवलं.
6 / 6
कथेनुसार, कंबुने नागराजची कन्येसोबत लग्न केलं आणि कंबुज राजवंशाची सुरूवात केली होती. पण इथे परदेशी लोकांची नजर पडली आणि त्यांनी इथे राहणाऱ्या हिंदू लोकांचं तलवारीच्या जोरावर धर्मांतर केलं. पण येथील लोक अजूनही स्वत:ला हिंदूच मानतात.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सhistoryइतिहासTempleमंदिर