1 / 11आपासून तीस वर्षापूर्वी लोकांकडे इंटरनेट नव्हतं. अशात पॉर्न कल्चरही नव्हतंच. मात्र, जशी टेक्नॉलॉजीने प्रगती केली, त्याच प्रमाणे पॉर्न इंडस्ट्रीही विकसित झाली. आता एका प्रमुख कायदे तज्ज्ञांनी दावा केला आहे की, डीपफेक पॉर्नोग्राफी येत्या काळात शोषणाची 'महामारी' ठरू शकते. (All Image Credit : Google)2 / 11गेल्या काही वर्षात एखाद्या व्यक्तीचा चेहरा चेहरा बदलून ती इमेज मोडिफाय करण्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र, डीपफेक टेक्नीकमुळे हीच प्रक्रिया आता व्हिडीओतही केली जाऊ शकते. ही बाब येत्या काळात अनेक लोकांसाठी खासकरून महिलांसाठी नुकसानकारक ठरू शकते.3 / 11डीपफेक एक अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यात कॉम्प्युटर टेक्नीकचा वापर करून कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर कोणताही चेहरा लावला जाऊ शकतो आणि ही टेक्नीक इतकी परफेक्ट आहे की, यात त्या व्हिडीओतील चेहरा दुसऱ्या व्यक्तीचा लावला हेही कळून येत नाही. म्हणजे ते तंतोतंत खरं वाटतं.4 / 11डीपफेक टेक्नीक काही वर्षाआधी जेव्हा मार्केटमध्ये आली तेव्हा लोकांना वाटलं होतं की, याने फेकन्यूज घटना वाढू शकतात. कारण कोणत्याही राजकीय नेत्याची फेक इमेज वापरून त्यांचं वक्तव्य बदलून ते व्हायरल केलं जाऊ शकत होतं. या टेक्नीकचे आता घातक पैलू समोर येत आहेत. 5 / 11डीपफेक्सचे तज्ज्ञ हेनरी एजडर या टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटला बारकाईने फॉलो करत आहेत. त्यांनी बीबीसीसोबत बोलताना सांगितले की, डीपफेकची क्रेझ २०१७ च्या आसपास सुरू झाली होती. एका व्यक्तीने एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर शेअर करण्यासोबतच ही टेक्नीक सामान्य लोकांसाठी थोडी सोपी केली होती.6 / 11ते पुढे म्हणाले की, आधी डीपफेकसाठी कठीण व्हिज्युअल्स इफेक्ट्स आणि प्रोग्रामिंगची गरज पडत होती. पण आता जास्तीत जास्त लोक हे सहज करू शकतात. हे सगळं व्यक्तीकडे कोणता कॉम्प्युटर आहे त्यावर अवलंबून आहे. ते म्हणाले की, याचा फार चुकीचा वापर होऊ शकतो आणि याला गंभीरतेने घेण्याची गरज आहे.7 / 11ते म्हणाले की, यावर जर वेळीच कंट्रोल मिळवला गेला नाही आणि गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला गेला नाही तर ही एक महामारीचं रूप धारण करू शकते. याला शोषणाची महामारी म्हणणं चुकीचं ठरणार नाही.8 / 11हेलेन म्हणाली की, मी जसे हे फोटो पाहिले, तसा माझ्या डोक्यात विचार आला की, मी असं काय केलंय की, मला हा दिवस बघावा लागला? माझी काहीच चूक नसतानाही मला स्वत:बद्दल लाज वाटत होती.9 / 11हेलेनला दिलासा हा होता की, कुणी तिचा चेहरा वापरून डीपफेक व्हिडीओ बनवला नव्हता. तिने तिचे ते फोटो आता हटवले आहेत. पण इंग्लंडमध्ये फोटोसोबत मॅनिपुलेशन करणं आतापर्यंत क्राइम मानलं जातं. अशात हेलेनला अजूनही समजलं नाही की, तिच्या फोटोसोबत कुणी छेडछाड केली होती.10 / 11डरहम यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक मेक्ग्लायन याबाबत म्हणाले की, सद्या तर डीपफेकचे शिकार झालेल्या लोकांची संख्या बरीच कमी आहे. पण जर आपण याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर ही भविष्यात एक मोठी समस्या ठरू शकते.11 / 11ते म्हणाले की, यावर जर वेळीच कंट्रोल मिळवला गेला नाही आणि गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला गेला नाही तर ही एक महामारीचं रूप धारण करू शकते. याला शोषणाची महामारी म्हणणं चुकीचं ठरणार नाही.