शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विसरभोळेपणाचा कळस! ५० वर्षांनंतर परत केले लायब्ररीचे पुस्तक; दंड ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 12:00 PM

1 / 10
आपल्याकडे ग्रंथालयांची मोठी परंपरा आहे. सर्वांना आवडीची पुस्तके विकत घेणे शक्य नसते, यासाठी ग्रंथालयांमध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तर काही जण जुनी पुस्तके वाचण्यासाठी ग्रंथालयात जातात.
2 / 10
एखाद्या विषयावर अभ्यास करणारे संदर्भासाठी ग्रंथालयात जातात. ग्रंथालयात जाणाऱ्यांची कारणे अनेकविध असली, तरी ग्रंथालयात जाण्याची ओढ कमी झालेली नाही, असेच दिसते.
3 / 10
ग्रंथालयातील पुस्तक परत करण्यास उशीर झाला किंवा हरवले, तर ज्या व्यक्तीने नेले, त्याच्याकडून दंड वसूल केला जातो. ग्रंथालयातील पुस्तक हरवणे ही मोठी गोष्ट मानली जाते.
4 / 10
मात्र, एका देशात तब्बल ५० वर्षांनंतर ग्रंथालयातून नेलेले पुस्तक परत करण्यात आल्याची घटना घडली आहे. एवढेच नव्हे, तर त्याबाबतचा दंडही भरण्यात आला आहे.
5 / 10
पेंसिल्वेनियामधील उत्तर पूर्व भागात असलेल्या एका ग्रंथालयात हा प्रकार उघडकीस आला आहे. या ग्रंथालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वाचकाने बर्टन हॉब्सन यांनी लिहिलेले कॉइन्स यू कॅन कलेक्ट नावाचे पुस्तक तब्बल ५० वर्षानंतर परत केले आहे.
6 / 10
सदर ग्रंथालयाने हे पुस्तक हरवल्याची नोंद केली होती. पण, तब्बल ५० वर्षांनंतर पुस्तक परत केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ज्या व्यक्तीने हे पुस्तक परत केले आहे, त्याने एक पत्रही ग्रंथालयाला लिहिले असून, दंड म्हणून २० डॉलरही ग्रंथालयाला पाठवले आहेत.
7 / 10
सुमारे ५० वर्षांपासून एका लहान मुलीने हे पुस्तक ग्रंथालयातून नेले होते. इतकी वर्ष हे पुस्तक खूप चांगल्या प्रकारे ठेवण्यात आले आहे. हे पुस्तक परत करण्याचा विचार अनेकदा येऊन गेला. परंतु, काही कारणास्तव ते शक्य झाले नाही.
8 / 10
पुस्तक परत आणून दिले नाही, म्हणून २० डॉलरचा दंड होणार नाही, हे मला माहिती आहे. पण, सदर रक्कम या विश्वासाने पाठवण्यात आली आहे की, याचा सदुपयोग अन्य मुलांच्या दंडाच्या रकमेच्या स्वरुपात केला जाऊ शकेल.
9 / 10
या पत्रावर प्रतिक्रिया देताना ग्रंथालय संचालक लॉरा केलर यांनी म्हटले आहे की, सदर व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे आम्ही कारवाई केली. या रकमेचा वापर युवक तरुणी, मुले यांच्या दंडासाठी केला गेला. जेणेकरून त्यांना पुन्हा ग्रंथालयातून पुस्तके नेणे शक्य होईल.
10 / 10
या ग्रंथालयाच्या नियमाप्रमाणे ५ डॉलरपेक्षा अधिक दंडाची कारवाई केल्यास अधिकाऱ्याला निलंबित केले जाऊ शकते. पेंसिल्वेनियामधील या घटनेची चर्चा सुरू असून, पत्र नेमके कुणी पाठवले, याचा खुलासा झालेला नाही, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :libraryवाचनालयJara hatkeजरा हटके