lifestyle of akash ambani, See the picture of before weddding
अंबानीपुत्राचा थाटमाट, जाणून घ्या आकाशची लाईफस्टाईल By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 4:19 PM1 / 7अंबानीपुत्र आकाश आणि श्लोका यांचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरला. देशातील या सर्वात श्रीमंत बापाच्या मुलाचं लाईफस्टाईल कसंय हे जाणुया. 2 / 7आकाश हा मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा असून त्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. तर पदवीचे शिक्षण अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात घेतले.3 / 7आकाश हे क्रिकेटसह सॉकरचेही मोठे चाहते आहेत. तर इंग्लिश प्रिमियर पाहणेही आकाशचा छंद आहे. आकाश अमेरिकेतच राहू इच्छित होते, पण त्यांच्या वडिलांनी त्यांना भारतात येण्याचा आग्रह केला. 4 / 7आकाश यांनी नुकतेच स्वित्झर्लंडच्या सेंट मोरिट्ज येथे तीन दिवसीय प्री वेडिंग पार्टी केली. ज्यामध्ये रॉकबँड कोल्डप्ले आणि अमेरिकन डीजे द चेनस्मोकर्स हेही सहभागी झाले होते. 5 / 7इंटरनेटचा वापर माहिती घेण्यासाठी अन् अभ्यासासाठी करायलाच आकाश यांना आवडते. त्यांचे हे विचार सव्वाशे कोटी भारतीयांपर्यंत पोहोचविण्याचा सल्ला पिता मुकेश यांनी आकाशला दिला आहे.6 / 7आपल्या आठवणी जपायलाही आकाश यांना आवडते, त्यांच्याकडे आर्सेनलजी जर्सी आहे. तर 1983 साली सुनिल गावस्कर यांनी वर्ल्डकप खेळताना वापरलेली बॅटही आहे. 7 / 7आकाश अंबानी यांना कारचाही मोठा शौक आहे. त्यांच्याजवळ बेंटले बेंटगाया, रेंज रोवर, वोग आणि रॉल्स रायस, फँटम ड्रापहेड काऊपे या गाड्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications