Lockdown News: 7-month-pregnant woman gives birth to 5 children in UP pnm
Lockdown News: ७ महिन्याच्या गरोदर महिलेने एकाचवेळी दिला ५ मुलांना जन्म; डॉक्टरही झाले हैराण! By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 3:46 PM1 / 7सध्या कोरोना व्हायरसमुळे ३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. सगळीकडे लॉकडाऊन कधी संपणार? याचीच चर्चा सुरु असताना एका बातमीनं लोकांसोबत डॉक्टरही हैराण झाले आहेत.2 / 7उत्तर प्रदेशातील बाराबंकी, सूरतगंज येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात एका महिलेने पाच मुलांना एकत्र जन्म दिला आहे. या प्रकरणात डॉक्टरही आश्चर्यचकित आहेत. सर्व मुलं कमी वजनाची आहेत त्यांना एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. महिलेची ७ व्या महिन्यातच प्रसूती झाली आहे.3 / 7सीएचसी प्रभारी डॉ. राजर्षी त्रिपाठी म्हणाले की, अशा प्रकरणांना क्विनट्यूपलेट म्हणतात ज्यामध्ये अनेक प्रसूती होतात. सावधगिरी म्हणून महिला व बालकांना लखनऊ येथील रुग्णालयात जायला सांगितले आहे.4 / 7सूरतगंजमधील कुतलूपूर येथील अनिता गौतम (वय ३२) यांनी पाच मुलांना जन्म दिला. त्यांचे पती कुंदन गौतम यांनी सांगितले की, पत्नी अनिता सकाळी बाथरूममध्ये गेली होती तिथे वेदना झाल्यानंतर एका मुलाचा जन्म झाला. तात्काळ आशासेविकांना बोलावून रुग्णवाहिकेच्या मदतीने सूरतगंज येथील सीएचसी रुग्णालयात आणलं. 5 / 7सकाळी आठ वाजता तेथे चार मुलांचा जन्म झाला. डॉक्टरांनी तातडीने पाच मुले व पत्नीला जिल्हा महिला रुग्णालयात जाण्यास सांगितले. 6 / 7जिल्हा महिला रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ इंद्रभूवन तिवारी यांनी सांगितले की अनिताची ७ महिन्यांत अकाली प्रसूती झाली आहे. एका मुलाच्या डोक्यात जखम आहे. बाकीचे ठीक आहेत पण अकाली जन्मामुळे रक्तवाहिन्या, मेंदू, फुफ्फुस, डोळे आणि हृदय यांचा पूर्ण विकास होण्याची शक्यता नाही असं ते म्हणाले.7 / 7डॉ. राजर्षी त्रिपाठी यांनी सांगितले की या प्रकरणाला क्विनट्यूपलेट म्हणतात. सर्व मुले कमी वजनाची आहेत, म्हणून सर्वप्रथम या मुलांची वजने नॉर्मल करण्याचं आव्हान आमच्यासमोर आहे. पाच मुले झाल्यामुळे नवजात बालकाचे वजन सामान्यपेक्षा कमी होते. त्यापैकी दोघांचे वजन एक किलो शंभर ग्रॅम तर दोघांचे ९०० ग्रॅम आहे. एका बाळाचे ८०० ग्रॅम वजन आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications