शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Lockdown News: लॉकडाऊनमध्ये ‘तो’ भाजी घ्यायला बाजारात गेला अन् लग्न करुन घरी परतला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 4:27 PM

1 / 8
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊन काळात असे अनेक किस्से तुम्हाला ऐकायला मिळाले असतील. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं असेल. लॉकडाऊनचं उल्लंघन करत लोकांनी वेगवेगळ्या शक्कल शोधून काढल्या.
2 / 8
लॉकडाऊन दरम्यान एक तरूण भाजीपाला आणि रेशन घेण्यासाठी बाजारात गेला, पण जेव्हा तो घरी परत आला, तेव्हा त्याच्यासोबत त्याची लग्न करुन आणलेली बायको होती. लग्नाची ही अजब घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील आहे.
3 / 8
गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद भागात अचानक घरी आलेल्या सूनेला पाहून तरुणाच्या आईचे होश उडाले. मुलाने लॉकडाऊनमध्ये हा मुलगा आपल्या प्रेयसीला पत्नी म्हणून घरी घेऊन आला होता.
4 / 8
अचानक घडलेल्या या प्रकाराने संतप्त मुलाच्या आईने सूनेला तिच्या घरात येण्यापासून रोखले. यानंतर संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले.
5 / 8
नवरीच्या ड्रेसमध्ये प्रेयसी आणि तरुण दोघंही पोलीस ठाण्यात हजर झाले. मुलाची आईसुद्धा त्याठिकाणी उपस्थित होती लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या मुलाला घरात प्रवेश देणार नाही अशा शब्दात तिने विरोध केला.
6 / 8
मुलगा घरातून भाजी आणि रेशन आणायला गेला आणि प्रेयसीशी लग्न करुन घरी परतला. आईला ही गोष्ट न पटल्याने तिने विरोध कायम ठेवला त्यामुळे पोलिसांनी वधू-वरांना स्वतंत्र भाड्याच्या घरात राहण्यास सांगितले आहे.
7 / 8
लॉकडाऊन दरम्यान, हा तरुण घराबाहेर पडून लग्न करुन अचानक आल्याने लोकही हैराण झाले. साहिबाबादच्या श्याम पार्क भागात राहणाऱ्या या तरुणाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
8 / 8
मुलाच्या आईचं म्हणणं आहे की, त्यांचे लग्न झाले आहे की नाही याचा पुरावा नाही. जेव्हा मुलाशी बोलले, तेव्हा तो म्हणतो की त्याने मंदिरात लग्न केले. मात्र हे संपूर्ण प्रकरण पोलिस ठाण्यात पोलिसांसाठी डोकेदुखी ठरले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या