शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जेव्हा १८ वर्षाच्या फिलिपच्या प्रेमात पडली होती १३ वर्षाची एलिजाबेथ, कशी झाली होती पहिली भेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 4:52 PM

1 / 15
साल होतं १९३९. १३ वर्षांची राजकुमारी एलिजाबेथची रॉयल नेवल कॉलेज टूरवर १८ वर्षीय कॅडेट फिलिप माउंटबॅटनसोबत भेट झाली होती. तेव्हाच दोघे एकमेकांवर फिदा झाले. तेव्हापासून प्रेम पत्र लिहिण्याचा सिलसिला सुरू झाला. अखेर फिलिपने एलिजाबेथचा हात मागितला.
2 / 15
१९४६ मध्ये दोघांनी लपून साखरपुडा केल आणि एक वर्षाने दोघांचं लग्न झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर हा शाही घराण्यात पहिला सोहळा होता. तेव्हापासूनचा हा प्रवास ९ एप्रिल २०२१ ला पूर्ण झाला जेव्हा प्रिन्स फिलिपने विंडसर कॅसलमध्ये अखेरचा श्वास घेतला. राणीसोबत ७४ वर्षे संसार करून ते राणीला एकटे सोडून गेले.
3 / 15
एलिजाबेथ आणि फिलिप जेव्हा भेटले तेव्हा त्यांच्यातील केमिस्ट्री कमाल होती. दोघांच्या आवडीनिवडीही सारख्याच होत्या. दोघे पहिल्यांदा १९३४ मध्ये एका लग्नात भेटले होते. नंतर तेव्हा भेटले जेव्हा नेवल कॉलेजमध्ये फिलिप एक कॅडेट होता.
4 / 15
हळूहळू प्रेम फुलत गेलं आणि १९४६ मध्ये त्यांचा लपून साखरपुडा झाला. २० नोव्हेंबर १९४७ ला २ हजार लोकांसमोर त्यांचं लग्न झालं. एलिजाबेथ आणि फिलिप दोघेही सार्वजनिक असो वा खाजगी सर्वच चढ-उतारांना सामना सोबत करत होते.
5 / 15
राणी एलिजाबेथ यांनी लग्नाच्या ५०व्या वाढदिवसाला प्रिन्स फिलिपकडून ताकद मिळण्याचा उल्लेखही केला होता. असे म्हटले जाते की, प्रिन्स फिलिप शाही घराण्यात एक वेगळीच ऊर्जा भरत होते. नेवल ऑफिसर राहिलेल्या फिलिपने ब्रिटनच्या शाही शासनाला बरंच बदललं होतं.
6 / 15
फिलिप हे राजकीय आणि सामाजिक अडचणी दूर करण्यासाठी एलिजाबेथ यांची मदत करत होते. १९९० मध्ये बदलत्या काळानुसार, शाही नियमांनाही नवं रूप देण्यात त्यांची महत्वाची भूमिका होता. इतकेच काय कर टीव्हीच्या मदतीने शाही मान वाढवण्याची आयडिया त्यांचीच होती.
7 / 15
फिलिप यांनी १९५३ मध्ये महाराणीच्या राज्याभिषेकाचा लाइव टेलिकास्ट करण्यावर जोर दिला. २५ व्या वर्षी एलिजाबेथ महाराणी बनल्या तेव्हा फिलिप त्यांच्यासोबत होते. असे म्हणतात की, ते महाराणींना त्यांच्या शाही ड्युटीपेक्षा वेगळं एक जीवनसाथी म्हणून बघत होते.
8 / 15
इतकेच काय तर टीव्हीवर मुलाखत देणारे ते पहिले शाही सदस्य होते. बरेच दिवस आजारी राहिल्यानंतर त्यांनी ९९ वर्षांचे असताना अखेरचा श्वास घेतला. याआधी ते विंडसर कॅसलमध्ये महाराणीसोबत राहत होते.
9 / 15
या ७४ वर्षात दोघांनी एकमेकांना प्रत्येक पावलावर साथ दिली. अनेकदा दोघांमध्ये दरी निर्माण झाल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. पण अखेरपर्यत दोघे सोबत राहिले. त्यांच्या अनेक फोटोंमधून त्यांचं प्रेम दिसून येतं.
10 / 15
शाही इतिहासकार ह्यूगो विकर्सने रॉयटर्सला सांगितले की, फिलिपने नेहमीच एलिजाबेथचा प्रत्येक प्रकारे साथ देणं हीच आपली ड्यूटी समजलं होतं. ते राणीला सत्य सांगत होते.
11 / 15
शाही इतिहासकार ह्यूगो विकर्सने रॉयटर्सला सांगितले की, फिलिपने नेहमीच एलिजाबेथचा प्रत्येक प्रकारे साथ देणं हीच आपली ड्यूटी समजलं होतं. ते राणीला सत्य सांगत होते.
12 / 15
शाही इतिहासकार ह्यूगो विकर्सने रॉयटर्सला सांगितले की, फिलिपने नेहमीच एलिजाबेथचा प्रत्येक प्रकारे साथ देणं हीच आपली ड्यूटी समजलं होतं. ते राणीला सत्य सांगत होते.
13 / 15
शाही इतिहासकार ह्यूगो विकर्सने रॉयटर्सला सांगितले की, फिलिपने नेहमीच एलिजाबेथचा प्रत्येक प्रकारे साथ देणं हीच आपली ड्यूटी समजलं होतं. ते राणीला सत्य सांगत होते.
14 / 15
शाही इतिहासकार ह्यूगो विकर्सने रॉयटर्सला सांगितले की, फिलिपने नेहमीच एलिजाबेथचा प्रत्येक प्रकारे साथ देणं हीच आपली ड्यूटी समजलं होतं. ते राणीला सत्य सांगत होते.
15 / 15
शाही इतिहासकार ह्यूगो विकर्सने रॉयटर्सला सांगितले की, फिलिपने नेहमीच एलिजाबेथचा प्रत्येक प्रकारे साथ देणं हीच आपली ड्यूटी समजलं होतं. ते राणीला सत्य सांगत होते.
टॅग्स :LondonलंडनInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स