शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बेवफा चायवाला! प्रेमात धोका मिळताच उघडलं थेट 'चहाचं दुकान'; लव्हस्टोरीबाबत म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 11:50 AM

1 / 8
शिवपुरीच्या पोहरी येथील बसस्थानकासमोरील एका चहा विक्रेत्याची भन्नाट प्रेमकथा समोर आली आहे. त्याची प्रेमकथा ऐकली की सर्वांनाच वाईट वाटतं. प्रेमात फसवणूक झालेल्या या तरुणाने चहाचा स्टॉल टाकला आणि त्याला 'बेवफा चायवाला' असं नाव दिलं आहे.
2 / 8
बेवफा चायवाला... शिवपुरीसारख्या छोट्या शहरात हे नाव जो वाचतो तो एकदा तरी थांबतो आणि विचार करतो की चहा विक्रेत्याने आपल्या दुकानाचे असे नाव का ठेवले आहे. या नावामागची वेदनादायक गोष्ट आता समोर आली आहे.
3 / 8
या दुकानाचे नाव बेवफा चायवाला असं का ठेवण्यात आले, यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अनेक मुलींच्या प्रेमात आपली फसवणूक झाल्याचे दुकान चालकाने सांगितले. त्यामुळे त्याने चहाचे दुकान उघडले आणि त्याचे नाव बेवफा चायवाला ठेवले.
4 / 8
गेल्या तीन वर्षांपासून पवन कुशवाह नावाचा हा तरुण पोहरी बसस्थानकावर चहाचे दुकान चालवत आहे, दुकान सुरू केल्यापासून त्याने नावही बदललेले नाही. तीन वर्षांपूर्वी त्याची फसवणूक झाली होती, आजही त्याला एकही निष्ठावान व्यक्ती सापडलेली नाही.
5 / 8
पवन एका मुलीच्या प्रेमात पडला जिने त्याला फसवले. तो काही महिन्यांनी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला तिनेही त्याचा विश्वासघात केला. पवन सांगतो की, प्रेमाच्या शोधात भटकत असताना तो दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर तिनेही त्याचा विश्वासघात केला.
6 / 8
आता पुरे झाले, चार वेळा फसवणूक झाल्यावर त्याचा प्रेमावरचा विश्वास उडाला आणि मग त्याने बेवफा चायवाला नावाने स्वतःचे चहाचे दुकान उघडले.
7 / 8
मिळालेल्या माहितीनुसार, पवन कुशवाह या चहाच्या दुकानदाराने सांगितले की, तो 22 वर्षांचा आहे आणि त्याला अनेक मुलींनी प्रेमात फसवले आहे. त्यामुळे त्याने आपल्या दुकानाचे नाव बेवफा चायवाला ठेवले असून चहाचे दुकान उघडले आहे.
8 / 8
पवनची रोजची कमाई 800 ते 1000 रुपये आहे, म्हणजेच त्याची कमाई महिन्याला सुमारे 30 हजार आहे. पवन आता त्याच्या आयुष्यात आनंदी आहे आणि आपले आयुष्य जगत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - न्यूज 18 हिंदी)
टॅग्स :Jara hatkeजरा हटके