शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक असा साहसी उंदीर ज्याने वाचवला हजारो लोकांचा जीव, हिरो जिंकलं होतं गोल्ड मेडल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 12:26 PM

1 / 6
Gold Medalist Mouse: 2022 हे वर्ष संपत आलंय आणि 2023 हे नवं वर्ष येणार आहे. 2022 मध्ये अशा अनेक घटना घडल्या ज्या कधी विसरता येणार नाही. 2022 मध्ये एका बहादूर उंदराला पाहिलं ज्याने आपल्या जीवनात हजारो लोकांचा जीव वाचवला आणि तो हिरो बनला. या उंदराचा सन्मान करण्यासाठी त्याला गोल्ड मेडलही देण्यात आलं. या बहादूर उंदराचं नाव मगावा होतं. तो कंबोडियातील एका बॉम्ब स्क्वॉडमध्ये होता. मगावा आपल्या हुंगण्याच्या शक्तीने हे शोधत होता की, बारूदची सुरंग कुठे आहे. असं त्याने हजारो लोकांचे जीव वाचवले.
2 / 6
मगावाला ट्रेनिंग देण्यात आलं होतं. तो विस्फोटकांच्या सुरंग शोधून काढत होता. तो दारूगोळ्याचा वास घेऊन आपल्या हॅंडलरला सूचना देत होता. बदादूर मगावाने आपल्या करिअरमध्ये 71 लॅंडमाइन्स शोधून काढल्या. शिवाय 38 जिवंत बॉम्बची माहितीही दिली. मगावाचं करिअर 5 वर्षांचं होतं. त्याने अनेक लोकांचा जीव वाचवला.
3 / 6
बॉम्ब स्निफिंग टीमचा सदस्य राहिलेल्या मगावाला त्याच्या या बहादुरीसाठी ब्रिटिश चॅरिटीकडून गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार खासकरून डॉग्ससाठी होता. पण तो मगावाला देण्यात आला. मगावाला जेव्हा कंबोडियाला आणलं गेलं तेव्हा तो 2 वर्षांचा होता.
4 / 6
बेल्जिअमची एनजीओ APOPO कडून मगावा उंदराला ट्रेनिंग दिलं गेलं होतं. मगावाला बॉम्ब आणि दारूगोळा शोधण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं. त्याने त्याच्या 5 वर्षांच्या करिअरमध्ये 1.4 लाख वर्ग मीटर पेक्षा जास्त जमिनीवर बॉम्बचा शोध घेतला.
5 / 6
जानेवारी 2022 मध्ये वर्षांच्या मगावाने जगाचा निरोप घेतला. कंबोडियातील लोकांनी त्याच्या निधनावर दु:खं व्यक्त केलं होतं.
6 / 6
मगावाच्या मृत्यूनंतर APOPO संस्थेने सांगितलं की, त्यांनी त्यांच्या साहसी साथीदार गमावला आहे. त्याने त्याचं आयुष्य लोकांचा जीव वाचवण्यासाठी दिलं.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके