Maharaja of jind who bought belgium girl for marriage in 50000 rupees api
'या' राजाने 50 हजार रूपये देऊन केलं होतं परदेशी महिलेशी लग्न, तिच्या वडिलांचं होतं मुंबईत सलून! By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 12:37 PM1 / 13स्वातंत्र्याआधी भारतात अनेक छोटी छोटी वेगवेगळी साम्राज्ये होती. वेगवेगळे राजे ही साम्राज्ये सांभाळत होते. या राजांची जीवनशैली ही फारच लक्झरी आणि शाही होती. अनेक राजांची प्रेम प्रकरणे, लग्ने आजही चर्चेचा विषय ठरतात. अशाच एका श्रीमंत राजाचं एका परदेशी महिलेवर प्रेम जडलं आणि तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्यांनी त्या महिलेला चक्क तेव्हाच्या 50 हजार रूपयांमध्ये खरेदी केलं होतं.2 / 13त्यावेळी भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्जन होते. त्यांना हे लग्न पसंत पडलं नाही. पण राजांनी त्यांना सांगितले की, हे त्यांचं खाजगी आयुष्य आहे. पण याचा परिणाम असा झाला की, कर्जनने हा नियम केला की, महाराजा ओलिवला जींदच्या महाराणीची पदवी देऊ शकणार नाही. त्यामुळे महाराज कोणत्याही अधिकृत कार्यक्रमात ओलिवला घेऊन जाऊ शकत नव्हते.3 / 13ट्रिब्यून वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलं होतं. तसेच ऑस्ट्रेलियातील लेखिका कार्लाइट यंगरने सुद्धा तिच्या 'विकेड वुमन ऑफ राज' या पुस्तकात याबाबत उल्लेख केला आहे. जींग हे हरयाणातील सर्वात जुन्या रियासतींपैकी एक होती. 4 / 13या साम्राज्याची स्थापना राजा गजपत सिंह यांनी 1763 मध्ये केली होती. ते एक शिख राजा होते. महाराजा रणबीर सिंह हे या साम्राज्याचे सहावे राजा होते. जेव्हा त्यांना गादीवर बसवण्यात आलं तेव्हा त्यांचं वय केवळ 8 वर्षे होतं.5 / 13जेव्हा राजा मोठे झाले तेव्हा त्यांना अनेक विचित्र सवयी होत्या. महाराजा रणबीर सिंह झोपेतून फार उशीरा उठायचे. त्यांची इच्छा असे की, जेव्हाही ते झोपेतून उठतील तेव्हा त्यांच्या सर्व महाराण्या त्यांचे पाय दाबत दिसाव्यात.6 / 13रणबीर सिंहला एका परदेशी महिलेला राणी बनवायचं होतं. कार्लाइटने तिच्या पुस्तकात ओलिव मोनोलेस्कु नावाच्या बेल्जिअमच्या एका सुंदरीचा उल्लेख केलाय. राजाचं मन तिच्यावर जडलं होतं. ओलिवसोबत त्यांची भेट मुंबईत झाली होती. तिच्या वडिलांनी मुंबईत एक सलून सुरू केलं होतं.7 / 13रणबीर सिंह यांची ओलिवसोबत पहिली भेट मसूरीमध्ये झाली होती. इथे देश-विदेशातील राजे नेहमीच पार्ट्या करण्यासाठी येत असत. अनेक इंग्रज अधिकारी आणि त्यांच्या पत्नीही येत असत. इथे एका पार्टीत रणबीर सिंह यांना बोलवण्यात आलं होतं. इथे ओलिव तिच्या आईसोबत आली होती.8 / 13महाराजाचं आधीच दोन लग्ने झाले होती. त्यांना एक डेल्मा आणि गुरचरण कौर अशा नावाच्या दोन शिख पत्नी होत्या. पण त्यांचं मन ओलिववर जडलं होतं. ओलिव मुंबईला गेली तर राजाही तिच्या मागे गेले. राजा ओलिवला महागडे गिफ्ट देत होते आणि दोघे नेहमी भेटत होते. ओलिवही त्यांच्यावर प्रेम करू लागली तेव्हा राजांनी तिला लग्नासाठी विचारले.9 / 13ओलिवने सुद्धा लग्नासाठी तयारी दर्शवली. पण याचा निर्णय तिची आई करणार असं तिने राजांना सांगितले. आईच्या मर्जीशिवाय ती लग्न करू शकत नव्हती. ओलिवच्या आईने आधी लग्नास नकार दिला. पण नंतर तिने 50 हजार रूपयांची मागणी केली. राजांनी तिला लगेच 50 हजार रूपये दिले.10 / 13नंतर रणबीर सिंह आणि ओलिवचं लग्न एका खाजगी समारंभात संगरूरमध्ये झालं. ओलिवला तिचा धर्म बदलावा लागला. नंतर तिचं नावही बदलून जसवंत कौर ठेवण्यात आलं होतं.11 / 13त्यावेळी भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्जन होते. त्यांना हे लग्न पसंत पडलं नाही. पण राजांनी त्यांना सांगितले की, हे त्यांचं खाजगी आयुष्य आहे. पण याचा परिणाम असा झाला की, कर्जनने हा नियम केला की, महाराजा ओलिवला जींदच्या महाराणीची पदवी देऊ शकणार नाही. त्यामुळे महाराज कोणत्याही अधिकृत कार्यक्रमात ओलिवला घेऊन जाऊ शकत नव्हते.12 / 13कालांतराने महाराज रणबीर सिंह यांचं ओलिववरील प्रेम कमी झालं. ओलिव सुद्धा राजांच्या वागण्याला वैतागली होती. तिला राजासोबत कुठेच जाता येत नसल्याने वाईट वाटत होतं. यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले होते. 13 / 13कालांतराने महाराज रणबीर सिंह यांचं ओलिववरील प्रेम कमी झालं. ओलिव सुद्धा राजांच्या वागण्याला वैतागली होती. तिला राजासोबत कुठेच जाता येत नसल्याने वाईट वाटत होतं. यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications