शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तिहार तुरूंगात कैद होती ही भारतातील सर्वात सुंदर महाराणी, वर्ल्ड रेकॉर्डही केला होता नावे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 12:20 PM

1 / 10
जयपूरची महाराणी गायत्री देवी (Maharani Gayatri Devi) यांची आज पुण्यतिथी आहे. दिल्लीच्या तिहार तरूंगात राहणारी ती भारतातील सर्वात सुंदर महाराणी होती. त्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या टिकाकार होत्या. महाराणी गायत्री देवी यांना इमरजन्सी काळात अटक करण्यात आली होती. महाराणी कॉंग्रेसच्या विरोधात निवडणूक लढल्या होत्या. चला जाणून घेऊन महाराणी गायत्री देवी यांच्याबाबत काही खास गोष्टी...
2 / 10
असं सांगितलं जातं की, महाराणी गायत्री देवी (Maharani Gayatri Devi) एक असामान्य महिला होत्या. महाराणी गायत्री देवी यांचं नाव Vogue मॅगझिनच्या सर्वात जास्त सुंदर १० महिलांच्या यादीत सामिल होतं.
3 / 10
महाराणी गायत्री देवी १९६२ ते १९७५ पर्यंत लागोपाठ खासदार होत्या. १९६२ मध्ये त्या पहिल्यांदा स्वतंत्र पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवल्या होत्या आणि कॉंग्रेस उमेदवार शारदा देवी यांना मोठ्या अंतराने पराभूत केले होते.
4 / 10
त्यांना २५०,२७२ पैकी १९२,९०९ मते मिळाली होती. तर कॉंग्रेस उमेदवाराला ३५,२१७ मते मिळाली होती. निवडणुकीत इतक्या मोठ्या मतांनी निवडून आल्यावर त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमद्ये दाखल करण्यात आलं होतं.
5 / 10
महाराणी गायत्री देवी यांचा जन्म २३ मे १९१९ मध्ये यूनायटेड किंगडम लंडनमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव जितेंद्र नारायण आणि त्यांच्या आईचं नाव इंदिरा देवी होतं.
6 / 10
महाराणी गायत्री देवी यांचे वडील बंगाल कूच बिहारचे राजा होते. महाराणी गायत्री देवी यांचं लग्न जयपूरचे महाराजा सवाई मान सिंह दुसरे यांच्यासोबत झालं होतं.
7 / 10
महाराणी गायत्री देवी या साधारण ५ महिने तिहार तुरूंगात कैद होत्या. इमरजन्सी दरम्यान १९७५ मध्ये त्यांना अघोषित संपत्तीच्या आरोपात अटक करण्यात आली होती. तुरूंगात बाहेर आल्यावर साधारण १ वर्षाने त्यांना राजकारणातून सन्यास घेतला होता.
8 / 10
महाराणी गायत्री देवी यांचं निधन वयाच्या ९०व्या वर्षी २९ जुलै २००९ ला झालं होतं.
9 / 10
महाराणी गायत्री देवी यांचं निधन वयाच्या ९०व्या वर्षी २९ जुलै २००९ ला झालं होतं.
10 / 10
महाराणी गायत्री देवी यांचं निधन वयाच्या ९०व्या वर्षी २९ जुलै २००९ ला झालं होतं.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेhistoryइतिहास