शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

येथे गीता आणि कुराणाचे एकत्र पठण केले जाते, गांधीजींची आई 'या' संप्रदायाची अनुयायी होती...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 6:33 PM

1 / 10
गांधीजींनी त्यांचं आत्मचरित्र 'माझे सत्याचे प्रयोग' मध्ये लिहिलं आहे की त्यांच्या आयुष्यातील प्रमाणी पंथाच्या शिकवणींनी प्रभावित झाले होते. कारण त्यांची आई पुतलीबाई यावर विश्वास ठेवत होती. गांधींची आई पुतलीबाई या हिंदू असूनही प्रणामी संप्रदायावर विश्वास ठेवत होत्या.
2 / 10
महात्मा गांधींनी प्रणामी पंथातील दोन धर्मांच्या संगमाचे वर्णन केलं आहे. गांधी म्हणतात की 'माझं कुटुंब प्रणामी संप्रदायाला फॉलो करणारं होतं, जरी आम्ही जन्माने हिंदू असलो तरी प्रणामी पंथाचा आम्हाला आदर होता.
3 / 10
हा संप्रदाय ४०० वर्षांपूर्वी गुजरातच्या जामनगरमध्ये प्रणामी नावाने सुरू झाला होता. त्यानंतर या संप्रदायाशी जोडलेल्या लोकांची संख्या वाढत गेली.
4 / 10
प्रणामी संप्रदाय हा गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि नेपाळ पर्यंत पसरला आहे. त्याचबरोबर मुंबईतही किमान ५ हजार प्रणामी अनुयायी राहतात.
5 / 10
प्रणामी समाजाला निजानंद संप्रदाय असंही म्हणतात. देव राज जी मानणारा हा समाज आहे. तो त्यांना अंतिम सत्य मानतो. त्यामुळं लोक त्यांच्या या तत्त्वज्ञानामुळंही या संप्रदायाकडं आकर्षित झालेले आहेत.
6 / 10
हा संप्रदाय १७ व्या शतकात भक्ती संत श्री देवचंद्र महाराज आणि त्यांचे प्रमुख श्री मेहराज ठाकूर या शिकवणीवर आधारित १७ व्या शतकात उदयास आला. ही परंपरा औरंगजेबाच्या मुस्लिमेतरांच्या धार्मिक छळामुळे वाढली होती.
7 / 10
बुंदेलखंडखंडचा राजा छत्रसालने या पंथाच्या लोकांचं रक्षण केले. प्रणामी परंपरेने हिंदू आणि मुस्लिमांनी श्री कृष्णाच्या पूजा परंपरेत सामील होण्याचे स्वागत केलं.
8 / 10
प्रणामी परंपरेचं धार्मिक केंद्र ईशान्य मध्य प्रदेशातील पन्ना शहरात आहे. दरवर्षी या संप्रदायाचा जामनगरमध्ये १२ दिवसांचा मोठा उत्सव असतो, त्याला पारायण असं म्हणतात.
9 / 10
येथे गीतेतील श्लोक व कुराणामधील आयते असेलल्या ग्रंथाचे श्रीकृष्ण व राजाच्या स्वरुपात पुजन केले जाते.
10 / 10
प्रणामी संप्रदायाचे लोक मग ते कोणत्याही धर्माचे असले तरी एकत्र भोजन करण्यावर विश्वास ठेवतात. ही पंरपरा ते आजही पाळतात.