make up brushes can be dirtier than toilet seats scientist reveals
बापरे! टॉयलेट सीटपेक्षा मेकअप ब्रश जास्त खराब; तज्ज्ञांनी सांगितलं सत्य, ऐकल्यावर बसेल धक्का By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 12:05 PM1 / 12आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात, ज्यावर आपण फारसे लक्ष देत नाही. उदाहरणार्थ, आपल्या आजूबाजूच्या गोष्टी किती सुरक्षित किंवा असुरक्षित आहेत. घाणेरड्या दिसणार्या गोष्टी आपण स्वच्छ करतो, पण ज्या गोष्टी घाणेरड्या दिसत नाहीत त्यांच्या धोक्याची आपल्याला कल्पना नसते. 2 / 12अशीच एक गोष्ट म्हणजे मेकअप ब्रशेस. याबद्दल धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. जे ऐकल्यावर तुम्हालाही मोठा धक्का बसेल. टॉयलेट सीटपेक्षा मेकअप ब्रश जास्त खराब असल्याचं सत्य शास्त्रज्ञांनी सांगितला आहे. 3 / 12तुम्ही कधी गांभीर्याने विचार केला आहे का की तुमच्या घरात ठेवलेले मेकअप ब्रश किती वेळा स्वच्छ करावेत? प्रत्येक वापरानंतर ब्रश धुवावा लागतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण ते क्वचितच केले जाते. 4 / 12कधीकधी ब्रश अनेक दिवस आणि आठवडे साफ केले जात नाहीत. स्पेक्ट्रम कलेक्शन्सने केलेल्या एका नवीन संशोधनानुसार, मेकअप ब्रश, जर नीट साफ न केल्यास, आपल्या घरातील टॉयलेट सीटइतके बॅक्टेरिया जमा होतात. 5 / 12कॉस्मेटिक सायंटिस्ट कार्ले मुस्लेह यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. अभ्यासात फाउंडेशन ब्रशचे दोन सेट वापरले गेले. एक स्वच्छ आणि एक गलिच्छ होते. जेव्हा 2 आठवड्यांच्या चाचणी कालावधीनंतर दोन्ही ब्रशची तुलना केली गेली. 6 / 12डर्टी ब्रशेसची तुलना टॉयलेट सीटवरून घेतलेल्या स्वॅबशी करण्यात आली होती. संशोधकांकडून बेडरुम, मेकअप बॅग, ब्रश बॅग, ब्रश ड्रॉवर आणि बाथरूमसह वेगवेगळ्या ठिकाणी ब्रश ठेवल्यात आले. 7 / 12या अभ्यासात समोर आलेल्या निकालानुसार, टॉयलेट सीटच्या तुलनेत सर्वत्र ठेवलेल्या ब्रशमध्ये जास्त बॅक्टेरिया असतात. दुसरीकडे, स्वच्छ ब्रशमध्ये कमी बॅक्टेरिया होते. 8 / 12यामध्ये सहभागी झालेल्या प्रतिसादकर्त्यांपैकी 40 टक्के लोकांनी सांगितले की ते त्यांचे ब्रश 2 आठवड्यात स्वच्छ करतात, तर 20 टक्के लोकांचा असा विश्वास होता की ते 1-3 महिन्यांनंतर स्वच्छ करतात.9 / 12कॉस्मेटिक सायंटिस्ट कार्ले यांच्या मते, जर ब्रश वारंवार साफ केला नाही तर टॉयलेट सीटवरील बॅक्टेरिया आपल्या चेहऱ्यावरही घर करू शकतात याची कल्पना करा. 10 / 12तुम्ही सुंदर दिसाल पण आजारी पडू शकता. यामुळे Staphylococcal सारखे गंभीर संक्रमण देखील होऊ शकते. त्यामुळे ब्रश वेळच्या वेळी स्वच्छ करा आणि आरोग्याची काळजी घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 12तुम्ही सुंदर दिसाल पण आजारी पडू शकता. यामुळे Staphylococcal सारखे गंभीर संक्रमण देखील होऊ शकते. त्यामुळे ब्रश वेळच्या वेळी स्वच्छ करा आणि आरोग्याची काळजी घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 12तुम्ही सुंदर दिसाल पण आजारी पडू शकता. यामुळे Staphylococcal सारखे गंभीर संक्रमण देखील होऊ शकते. त्यामुळे ब्रश वेळच्या वेळी स्वच्छ करा आणि आरोग्याची काळजी घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications