Male mice are terrified of bananas. know about why
केळी पाहून उंदीरमामांची उडते घबराट, वैज्ञानिकांचा दावा; चकित करणारं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 2:25 PM1 / 10उंदीर तुमच्या घरात नको असलेल्या पाहुण्यासारखे आहेत. दिसायला किळसवाणे असण्याव्यतिरिक्त, उंदीर रोग पसरवतात आणि आपल्या कुटुंबातील लोकांचे आरोग्य धोक्यात आणतात. त्यामुळे आपले घर स्वच्छ ठेवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे उंदरांपासून कायमची सुटका कशी करावी हे शोधणे. 2 / 10अनेकदा बंद घरामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळते. घरोघरी उंदरांचा त्रास सहन करावा लागतो. शहरात, अडगळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उंदीर झाल्याचं पाहायला मिळतं. उंदीर मारण्याासाठी बाजारात विविध औषध विक्री केली जाते. 3 / 10अलीकडच्या शोधात वैज्ञानिकांना उंदीर केळ्यांपासून घाबरतात हे कळालं आहे. केळ्यांचा वास उंदरांना सहन होत नाही. मॉन्ट्रियल, क्यूबेकमध्ये मॅकगिल यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. ज्यात उंदरांना स्ट्रेस हार्मोन असल्याचं समोर आले आहे. 4 / 10जेव्हा ते गर्भवती किंवा स्तनपान करणार्या उंदरांच्या जवळ होते तेव्हा हे घडले. शास्त्रज्ञांना संशोधनात आढळून आले की, उंदरांच्या लघवीतील एन-पेंटाइल एसीटेट नावाच्या संयुगामुळे उंदरांमध्ये हार्मोनल बदल होऊ लागले. 5 / 10या कपाऊंडमुळे केळीला एक विशेष सुगंध असतो. सायन्स एडव्हान्सेस या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनाचे वरिष्ठ लेखक जेफ्री मोगिल म्हणतात की, हे आमच्यासाठी आश्चर्यचकित होते, कारण आम्ही प्रत्यक्षात याचा शोध घेत नव्हतो, तो अचानक आमच्यासमोर आला. 6 / 10दुसर्या प्रयोगासाठी, आमच्या प्रयोगशाळेत विविध गरोदर उंदीर आणले होते आणि आमच्या एका विद्यार्थ्याच्या लक्षात आले की उंदीर विचित्र वागू लागले आहेत. सुरुवातीला आम्हाला याबाबत काहीच कळालं नाही. 7 / 10रिपोर्टमध्ये, संशोधकांनी लिहिले आहे की, नर उंदीर, विशेषत: जे व्हर्जिन आहेत, त्यांच्या अनुवांशिक फिटनेसला पुढे जाण्यासाठी भ्रूणहत्यासारखी आक्रमकतेमध्ये(Infanticidal Aggression) सहभागी होण्यासाठी ओळखले जातात. 8 / 10या संभाव्य भक्षकांपासून त्यांच्या लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी, गर्भवती आणि स्तनपान करणारी उंदीर त्यांच्या शरीरातून रसायने उत्सर्जित करतात. याद्वारे ती उंदरांना स्वतःपासून दूर राहण्याचा संदेश देते हे संशोधनात आढळले. 9 / 10मादी उंदरांच्या लघवीतील रसायनामुळे उंदरांमध्ये तणावाची पातळी वाढते, हे पाहिल्यानंतर हे रसायन इतर ठिकाणाहून आल्यास उंदीर तशाच प्रकारे वागतील का, असा प्रश्न संशोधकांना पडला. संशोधकांनी केळीचे तेल आणून ते कापसावर लावले. 10 / 10हा कापूस त्याने उंदरांच्या पिंजऱ्यात टाकला. त्याच्या वासाने उंदरांमध्ये तणावाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली, जसे मूत्राने होते. संशोधकांना असेही आढळून आले की व्हर्जिन उंदरांमध्ये तणावाची पातळी लक्षणीयरीत्या जास्त होती. आणखी वाचा Subscribe to Notifications