शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नशीब फळफळले, दोनदा लॉटरी जिंकली अन् करोडपती बनला 'हा' व्यक्ती...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 4:22 PM

1 / 8
नशीब बदलायला वेळ लागणार नाही असे म्हणतात. अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत असेच काही घडले. या व्यक्तीने दोन आठवड्यांत दोनदा लॉटरी जिंकली आणि करोडपती बनला.
2 / 8
दक्षिण कॅरोलिनामधील या व्यक्तीने दोन आठवड्यांपूर्वी 40,000 डॉलर्स म्हणजेच 29,70,162 रुपयांची लॉटरी जिंकली होती.
3 / 8
त्यानंतर पुन्हा याच व्यक्तीचे नशीब फळफळले आणि 14 दिवसांत आणखी 3 मिलियन डॉलर्सचा जॅकपॉट जिंकला. ही लॉटरी जिंकल्यानंतर या व्यक्तीला 2,27,31,250 रुपये मिळाले.
4 / 8
दोन वेळा लॉटरी जिंकणाऱ्या या व्यक्तीने साऊथ कॅरोलिना एज्युकेशन लॉटरीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, 40,000 डॉलर्सच्या मेगा मिलियन्स पुरस्कारानंतर स्वत:ला नशीबवान असल्याचे वाटत होते.
5 / 8
त्यामुळे 27 जुलै रोजी कारमध्ये इंधन भरण्यासाठी मर्फी यूएसए गॅस स्टेशनला भेट दिली आणि तेथे आणखी एक लॉटरी तिकीट विकत घेतले.
6 / 8
हा व्यक्ती म्हणाला की, माझ्या नशिबाच्या चांगल्या ओळी पुसल्या गेल्या नाहीत आणि दोन आठवड्यांनंतर 3 मिलियन डॉलर्सचा जॅकपॉट माझ्या हातात पडला.
7 / 8
'माझा विश्वासच बसत नव्हता, जेव्हा मी माझ्या कुटुंबीयांना सांगितले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. तसेच, मी मुलांना विचारलं, 'असं का होतंय?' असे लॉटरी जिंकणारा व्यक्ती म्हणाला.
8 / 8
लॉटरी अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेगा मिलियन्स खेळताना 40,000 डॉलर्स जिंकण्याची शक्यता 931,001 मधून कोणत्याही एकाची असते. तर 3 मिलियन डॉलर्स जिंकण्याची शक्यता 13 मिलियन लोकांमधून कोणत्याही एका व्यक्तीची होते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके