1 / 12लॉकडाऊनमुळे घरातच जास्तीत जास्त वेळ राहणारे लोक वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. कुणी पेंटिंग करतंय तर कुणी वेगवेगळ्या डिश तयार करतंय. 2 / 12काही लोक याहूनही वेगळी किंवा विचित्र कामे करत आहेत. ब्रिटनच्या डेवोनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनेही असंच एक वेगळं काम केलंय.3 / 12घरात बसून बसून त्याला कंटाळा आला होता त्यामुळे घराच्या भींतीवर छिद्र करण्यास सुरू केली होती. पण हे करत असताना त्याला अजिबात कल्पना नव्हती की, असं करून त्याच्यासमोर शेकडो वर्षांपासूनचं एक रहस्य येणार आहे.4 / 12या व्यक्तीचं नाव आहे जॅक ब्राउन. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला त्याच्या घराची एक भिंत जरा वेगळी वाटत होती. म्हणजे इतर भिंतीपेक्षा वेगळी होती. त्यामुळे हे वेगळेपण जाणून घेण्याची उत्सुकता जॅकमधे वाढली. 5 / 12त्याने लगेच ड्रिलींग मशीनच्या मदतीने भिंतीत एक छोटं छिद्र केलं. या छिद्रातून त्याने टॉर्चच्या प्रकाशात आतील नजारा बघण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला त्या छोट्या छिद्रातून जे दिसलं ते पाहून तो थक्क झाला.6 / 12जॅकला दिसलं की, टॉर्च प्रकाश दूरपर्यंत जात होता. आता तर जॅकची उत्सुकता आणखीनच ताणली गेली आणि आत काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. नंतर त्याने भींतीला एक मोठं छिद्र केलं, जेणेकरून तो सहजपणे सगळं बघू शकेल आणि दुसऱ्या बाजूला जाऊ शकेल.7 / 12ड्रिलींग मशीनच्या मदतीने काही वेळातच जॅकने भिंतीला एक मोठं छिद्र केलं. त्यातून तो आत गेला. आत असलेली भरपूर मोकळी जागा बघून तो हैराण झाला. ही जागा शेकडो वर्षांपासून अशीच होती. 8 / 12जॅकला जे दिसलं ते एक तळघर आहे आणि फार जुनं आहे. हे तळघर कमीत कमी 120 वर्ष जुनं आहे. यात मिळालेल्या वृत्तपत्राच्या तुकड्यांवरून हे समजलं की, हे तळघर साधारण 50 वर्षांपासून बंद आहे.9 / 12मीडिया रिपोर्ट्सनुसार, 120 वर्ष जुन्या या तळघराचा वापर अनेक वर्षांआधी पेंटचे डबे आणि काही वस्तू ठेवण्यासाठी केला जात होता. जॅकने सांगितले की, त्याला इथे वेगवेगळ्या वस्तू सापडल्या. तसेच त्याला एक जुनी सायकलही सापडली. 10 / 12मीडिया रिपोर्ट्सनुसार, 120 वर्ष जुन्या या तळघराचा वापर अनेक वर्षांआधी पेंटचे डबे आणि काही वस्तू ठेवण्यासाठी केला जात होता. जॅकने सांगितले की, त्याला इथे वेगवेगळ्या वस्तू सापडल्या. तसेच त्याला एक जुनी सायकलही सापडली. 11 / 12मीडिया रिपोर्ट्सनुसार, 120 वर्ष जुन्या या तळघराचा वापर अनेक वर्षांआधी पेंटचे डबे आणि काही वस्तू ठेवण्यासाठी केला जात होता. जॅकने सांगितले की, त्याला इथे वेगवेगळ्या वस्तू सापडल्या. तसेच त्याला एक जुनी सायकलही सापडली. 12 / 12मीडिया रिपोर्ट्सनुसार, 120 वर्ष जुन्या या तळघराचा वापर अनेक वर्षांआधी पेंटचे डबे आणि काही वस्तू ठेवण्यासाठी केला जात होता. जॅकने सांगितले की, त्याला इथे वेगवेगळ्या वस्तू सापडल्या. तसेच त्याला एक जुनी सायकलही सापडली.