Man injected magic mushroom fungi grew in his blood organ failure at science
धक्कादायक! 'या' व्यक्तीने शरीरात इंजेक्ट केलं मॅजिक मशरूमचं पाणी, नसांमध्ये उगवू लागले मशरूम.... By अमित इंगोले | Published: January 15, 2021 11:27 AM1 / 12अमेरिकेतील नेब्रास्कामध्ये एक ३० वर्षीय व्यक्तीने मशरूमचा रस काढून तो आपल्या शरीरात इंजेक्ट केला म्हणजे सुईच्या माध्यमातून नसांमध्ये टाकला. त्यानंतर काही तासांमध्येच त्याच्या नसांमध्ये मशरूम उगवू लागले. ज्यामुळे त्याला ऑर्गन फेल्युअरची समस्या आली. मोठ्या मुश्किलीने डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला. सोबतच त्याला सूचना केली की, आता त्याला अनेक वर्ष अॅंटी फंगल औषधे खावी लागतील. चला जाणून घेऊ काय आहे संपूर्ण घटना....2 / 12झालं असं की, ३० वर्षीय व्यक्ती बायपोलर डिसऑर्डर नावाच्या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. तो फार डिप्रेशनमध्ये राहतो. डॉक्टरांनी त्याला सायकेडेलिक मशरूम खाण्यास सांगितले होते. कारण या मशरूममध्ये सायलोसायबिन नावाचं तत्व असतं ज्याने रूग्णांचा मेंदू शांत राहतो. या व्यक्तीने सायकेडेलिक मशरूम उकडलं, ते पाणी कपड्यातून गाळून घेतलं आणि नंतर सुईच्या माध्यमातून नसांमध्ये इंजेक्ट केलं.3 / 12दोन दिवसांनंतर त्याला फार थकल्यासारखं जाणवत होतं. तो रक्ताची उलटी करत होता. त्याला पिलिया, डायरिया झाला होता. सोबतच तो कन्फ्यूज राहत होता. जेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासलं तेव्हा समोर आलं की, या व्यक्तीने सायकेडेलिक मशरूमचं पाणी शरीरात इंजेक्ट केलं आणि त्यामुळे त्याच्या नसांमध्ये मशरूम निर्माण होत आहेत.4 / 12डॉक्टरांना टेस्टनंतर समजलं की, त्याच्या लिवरवर जखम झाली आहे. त्याला तात्काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्याचं रक्त लगेच बदलण्यात आलं. शरीरात शिल्लक राहिलेल्या रक्तातून टॉक्सिन काढण्यासाठी त्याला २२ दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. त्यासा डिस्चार्ज दिला तेव्हा त्याला दोन अॅंटीबायोटिक आणि एक अॅंटी फंगल औषध देऊन पाठवण्यात आलं. 5 / 12सायकेडेलिक मशरूम खाल्ल्यानंतर शरीरात झालेल्या प्रभावाबाबत एक रिपोर्ट जर्नल ऑफ द अकॅडमी ऑफ कन्सल्टेशन लायसन सायकेट्रीमध्ये प्रकाशित झाला आहे. जे डॉक्टर या व्यक्तीवर उपचार करत होते त्यांनी सांगितले की, या व्यक्तीला बायपोलर डिसऑर्डर टाइप १ होता. तो अनेकदा डिप्रेशनचा शिकार झाला आहे. कधी हिंसक होत होता तर कधी फार शांत. त्यामुळे त्याला सायलोसायबिन नावाचं औषध खाण्याचा सल्ला दिला होता.6 / 12डॉक्टरांनी सायकेडेलिक मशरूम खाण्याचा सल्ला दिला होता. हे मशरूम मानसिक आजारात उपयोगी ठरतं. पण त्या व्यक्तीने त्याचं पाणी शरीरात इंजेक्ट केलं. सायकेडेलिक मशरूमला मॅजिक मशरूम असंही म्हटलं जातं. याने डिप्रेशन आणि एनजायटी दूर होण्यास मदत मिळते. पण याचा डोज डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा.7 / 12सायकेडेलिक मशरूमचा उपयोग कॅन्सरच्या अशा रूग्णांसाठीही केला जातो जे मानसिक रूपाने कमजोर असतात. किंवा जे डिप्रेशनचे शिकार असतात. याबाबत जॉन हॉपकिंस आणि न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीमध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. ज्या कॅन्सर रूग्णांना सायकेडेलिक मशरूमपासून तयार सायलोसायबिन तत्वापासून तयार औषध देण्यात आलं त्यांना फार आराम मिळाला.8 / 12सायलोसायबिन किंवा त्यापासून तयार औषध कधीच इंजेक्ट केलं जात नाही. ज्या व्यक्तीने मशरूमचं पाणी नसांमध्ये टाकलं त्यातून हा धडा मिळाला आहे. तीन आठवडे हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्याच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. 9 / 12डॉक्टरांनी सांगितले की, सायलोसायबिन सायकेडेलिक मशरूमचा उपयोग केवळ शिजवून खाण्यासाठी केला जातो. याचं पावडर किंवा पाणी तयार करून घेतलं तर नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मॅजिक मशरूमचा फायदा घेण्यासाठी ते खावं. तेही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच.10 / 12सायलोसायबिन मशरूमच्या जगभरात १८० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. ज्या मानसिक आजार ठीक करण्यात मदत करतात. यांपासून औषधेही तयार केली जातात. लोक हे डॉक्टरांच्या सल्ल्याने शिजवून खातात. अनेकदा लोक याचा वापर नशेसाठीही करतात. पण याबाबत अनेक देशातील सरकारने फार कठोर नियम केले आहेत.11 / 12सायलोसायबिन मशरूमच्या जगभरात १८० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. ज्या मानसिक आजार ठीक करण्यात मदत करतात. यांपासून औषधेही तयार केली जातात. लोक हे डॉक्टरांच्या सल्ल्याने शिजवून खातात. अनेकदा लोक याचा वापर नशेसाठीही करतात. पण याबाबत अनेक देशातील सरकारने फार कठोर नियम केले आहेत.12 / 12सायलोसायबिन मशरूमच्या जगभरात १८० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. ज्या मानसिक आजार ठीक करण्यात मदत करतात. यांपासून औषधेही तयार केली जातात. लोक हे डॉक्टरांच्या सल्ल्याने शिजवून खातात. अनेकदा लोक याचा वापर नशेसाठीही करतात. पण याबाबत अनेक देशातील सरकारने फार कठोर नियम केले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications