Man inserted 29 magnet balls inside private part for fun shocks doctor
बोंबला! मजेसाठी 'त्याने' प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले असे काही, सीटी स्कॅन पाहून डॉक्टरही झाले हैराण..... By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 12:53 PM1 / 9जगभरातून नेहमीच अशा घटना समोर येत असतात ज्या वाचून लोक हैराण होतात. यातील काही घटनांवर तर विश्वासही बसत नाही. नुकतीच चीनमधून एक अशी घटना समोर आली ज्याने डॉक्टरही हैराण झाले.2 / 9डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून लोह चुंबकाची चेन काढली. यात २९ मॅग्नेटिक बॉल्स होते. डॉक्टरांनी फार मेहनतीनंतर या व्यक्तीच्या शरीरातून ही चेन बाहेर काढली.3 / 9याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या व्यक्तीच्या शरीरात जेव्हा डॉक्टरांनी ही चेन पाहिली तेव्हा तेही हैराण झाले. कारण त्यांनीही अशी केस कधी पाहिली नव्हती.4 / 9ही घटना चीनच्या शांक्सीमधून समोर आली आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्तीला सीटी स्कॅननंतर लगेट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. कारण डॉक्टरांना सीटी स्कॅनमध्ये काही मॅग्नेटिक बॉल्स दिसले.5 / 9शांक्सीतील पीपल्स हॉस्पिटलमध्ये काम करणारे यूरोलॉजिस्ट क्यू ली मिंग यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या व्यक्तीच्या ब्लॅडरमध्ये अनेक मॅग्नेटिक बॉल्स होते.6 / 9हे बॉल्स सर्जरी करून बाहेर काढण्यात आलेत. डॉक्टरांना ब्लॅडरमधून हे मॅग्नेटिक बॉल्स बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला.7 / 9जेव्हा डॉक्टरांनी व्यक्तीला विचारले तर त्याने सांगितले की, त्याने एक-एक करून हे बॉल्स प्रायव्हेट पार्टमध्ये आत टाकले होते. नंतर हे बॉल्स आत जाऊन एकमेकांना चिकटले होते.8 / 9या व्यक्तीने सांगितले की, हे मॅग्नेटिक बॉल्स प्रायव्हेट पार्टच्या आत स्लिप झाले. त्याला अजिबात अंदाज नव्हता की, हा अनुभव इतका वेदनादायी ठरेल.9 / 9हे मॅग्नेटिक बॉल्स आत टाकल्यावर १० दिवसांनी व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत होतं. त्यानंतर तो लगेच हॉस्पिटलमध्ये गेला. तेव्हा डॉक्टरांना सीटी स्कॅनमध्ये हे बॉल्स दिसले. आणखी वाचा Subscribe to Notifications