शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कौतुकास्पद! शिल्पकारानं बनवला ४० तास तेवत राहणारा मातीचा दिवा, अन् मिळवला राष्ट्रीय पुरस्कार

By manali.bagul | Published: November 01, 2020 12:35 PM

1 / 6
देशातील सर्वच राज्यात सण उत्वस साजरे करण्याची सुरूवात झाली असून घराघरात तयारीला सुरूवात झाली आहे. दिवाळीत खास महत्व असतं ते म्हणजे दिव्यांना. दिव्यांशिवाय दिवाळीचा सण पूर्ण होऊच शकत नाही. छत्तीसगडमधील कोंडागाव येथिल रहिवासी असलेले अशोक चक्रधारी यांनी २४ ते ४० तासांपर्यंत जळणारा मातीचा दिवा तयार केला आहे.
2 / 6
शिल्पकार अशोक चक्रधारी यांनी दिलेल्या माहितीनुसार ३५ वर्षांपूर्वी त्यांनी असा दिवा पाहिला होता. आपणही असा दिवा बनवावा असं नेहमी त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी हा दिवा तयार केला आहे.
3 / 6
वृत्तसंस्था एएनआयने अशोक चक्रधारी यांच्या या कामगिरीबद्दल माहिती देत अशोक यांनी तयार केलेल्या दिव्याचे फोटोज पोस्ट केले आहेत. अशोक चक्रधारी यांनी सांगितले की, या वर्षी नवरात्रीत त्यांना कोणीतरी फोन करून सांगितलं की, तुम्ही जसा दिवा तयार केला आहे. तसाच दिवा आम्हाला बनवून हवा आहे.
4 / 6
अशोक यांना नंतर कळून आलं की, त्यांनी तयार केलेला दिवा तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे लोक त्यांना कॉल करत होते.
5 / 6
तेव्हापासून अशोक यांनी रोज ५० ते ६० विशेष दिवे तयार करायला सुरूवात केली. या दिव्यांची किंमत २०० ते २५० रुपये इतकी ठेवली आहे.
6 / 6
अशोक चक्रधारी यांना या दिव्यासाठी नेशनल मेरिट अवार्डचे प्रशस्तिपत्रक देण्यात आलं असून सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी सांगितले की ३५ वर्षांपूर्वी मी जो दिवा पाहिला होता. तोच दिवा लक्षात ठेवून मी हा दिवा तयार केला आहे.
टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडDiwaliदिवाळी