A man spent money on sugar babies and dated around twenty girlfriends in past seven years
बाबो! १० लाख खर्च करून बनवल्या २० गर्लफ्रेन्ड, तरूण म्हणाला - डेटींगसाठी कधीच नव्हता वेळ! By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 10:50 AM1 / 7जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये पारंपारिक डेटींगऐवजी रिलेशनशिपच्या नव्या पद्धती वापरणं पसंत करतात. यात सर्वात जास्त लोकप्रिय शुगर डेटींगची कॉन्सेप्ट आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीने नुकतेच सांगितले की, कशाप्रकारे तो रिलशनशिपच्या या नव्या कॉन्सेप्टच्या मदतीने गेल्या काही वर्षांमध्ये आकर्षक मुलींना डेट करत आहे.2 / 7अमेरिकेत राहणाऱ्या स्येट स्कोलॉफला कॉलेज ग्रॅज्युएशन दरम्यान अशी जाणीव झाली होती की, त्याला त्याच्या ग्रॅज्युएशनवर फोकस करायचा आहे. त्यामुळे तो डेटींगसाठी वेळ काढू शकणार नाही. त्याने यूनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधून फिलॉसॉफी आणि इकॉनॉमिक्सची डिग्री घेतली. आणि २८ व्या वर्षी तो हायप्रोफाइल जॉब करू लागला.3 / 7फॅब्युलस वेबसाइटसोबत बोलताना सेटने सांगितले की, माझा जॉब फारच हेक्टिक होता आणि मला तासंतास काम करावं लागत होतं. डेटींग अॅप बघण्यासाठी मला वेळ नव्हता. तरी सुद्धा अनेक क्यूट मुलींना मी डेट केलं. कारण कॉलेज संपल्यावर मी शुगर डॅडी बनण्याचा निर्णय घेतला होता.4 / 7सामान्यपणे डेटींगची ही कॉन्सेप्ट अमेरिकेत अधिक प्रसिद्ध आहे. यात मोठे उद्योगपती वा श्रीमंत लोक अधिक असतात. हे लोक आपल्या गर्लफ्रेन्डवर बराच पैसा खर्च करतात. बेबी शुगर त्यांना म्हटलं जातं ज्या फार आकर्षक महिला असतात आणि आपली लक्झरी लाइफस्टाइल मेंटेन ठेवण्यासाठी शुगर डॅडीचा आधार घेते. 5 / 7सेट म्हणाला की, त्याने गेल्या सहा वर्षात १० हजार पाउंड म्हणजे साधारण १० लाख रूपये बेबी शुगरवर खर्च केले. फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये खाणं, डिझायनर बॅग्स, फिरायला जाणं, पैसे या सर्व गोष्टी तो गर्लफ्रेन्डला देत होता. 6 / 7तो म्हणाला की, त्याचं जास्त काळ टिकलेलं रिलेशनशिप सहा महिन्यांचं आहे. तो म्हणाला की ,या कॉन्सेप्टबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. या कॉन्सेप्टची प्रॉस्टीट्यूशनसोबत तुलना केली जाऊ शकत नाही. हे सामान्य रिलेशनशिपसारखं आहे. फक्त एवढंच की, या आर्थिक गोष्टीला जास्त महत्व असतं.7 / 7गेल्या सहा वर्षापासून अशाप्रकारच्या रिलेशनशिपमध्ये राहून स्येटने आपली स्वत:ची वेबसाइट लॉन्च केली. तो म्हणाला की, या वेबसाइटच्या आधारे तो जास्तीत जास्त फेक शुगर बेबी प्रोफाइल हटवायचे आहे आणि आपल्या वेबसाइटच्या आधारे लोकांना रिलेशनशिपमध्ये मदत करायची आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications