A man went to the toilet and got bitten on private part by pet snake of his neighbour
अरे देवा! टॉयलेट सीटवर बसताच सापाने व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला मारला दंश आणि मग..... By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 1:15 PM1 / 8ऑस्ट्रियातून एका व्यक्तीसोबत एक विचित्र घटना घडली आहे. या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टवर सापाने दंश मारला आहे. तपासातून समोर आलं की, साप या व्यक्तीच्या शेजाऱ्याचा होता. हा साप ड्रेनेज सिस्टममधून बाहेर येत ६५ वर्षीय व्यक्तीच्या टॉयलेटमध्ये शिरला होता.2 / 8ऑस्ट्रियाच्या ग्राज शहरात राहणारी ही वृद्ध व्यक्ती सकाळी उठून वॉशरूमला गेली होती. पोलिसांनी सांगितलं की, ते टॉयलेट सीटवर बसताच त्यांना तिथे काहीतरी असल्याचं जाणवलं होतं. या व्यक्तीला नंतर ५ फूटाचा पायथन दिसला होता. 3 / 8व्यक्तीने काही करण्याआधी सापाने व्यक्तीवर हल्ला केला. यानंतर वृद्ध व्यक्तीने पोलिसांनी फोन केला. ते एका लोकल सर्पमित्राला घेऊन तिथे पोहोचले. वृद्ध व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता त्यांची तब्येत स्थिर आहे.4 / 8याबाबत डॉक्टर म्हणाले की, पायथॉन साप विषारी नसतात. पण साप टॉयलेटमधील बॅक्टेरियाने इन्फेक्ट झाला तर त्या व्यक्तीलाही इन्फेक्शनची शक्यता वाढू शकत होती.5 / 8पोलिसांनी सांगितलं की, या व्यक्तीच्या शेजाऱ्याकडे एक-दोन नाही तर ११ साप आहेत. हे साप विषारी नाहीत. त्यांनी हे साप पाळण्यासाठी खासप्रकारचे डिझाइन केलेले पिंजरे तयार केले आहेत. 6 / 8२४ वर्षीय व्यक्तीला माहीत नव्हतं की, त्याचा पायथन साप गायब आहे. जेव्हा पोलीस त्या सापाला त्याच्याकडे परत घेऊन गेले तेव्हा त्यालाही समजलं की, साप पिंजऱ्यातून बाहेर कसा आहे. 7 / 8सापांच्या तज्ज्ञांनी स्थानिक मीडियाला सांगितलं की, ते गेल्या ४० वर्षांपासून सापांसोबच डील करत आहेत. पण त्यांनी आतपर्यंत कधीच अशा घटनेबाबत ऐकलं नव्हतं की, साप ड्रेनेजमधून निघून एखाद्याच्या टॉयलेटमध्ये शिरला.8 / 8त्यासोबतच पोलिसांनी स्थानिक एनिमल सर्व्हिसला अलर्ट दिला होता की, या व्यक्तीच्या घरात अनेक खतरनाक साप आहे. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications